कोपरगाव तालुका
शरद थोरातांचे पक्षासाठी योगदान काय ? माजी शहरप्रमुख भरत मोरेंचा सवाल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी आपल्याला कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदाचा शब्द देऊही असलेले असल्याचा आरोप नुकताच केला होता.त्यावर भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष शरद थोरात यांनी झावरे यांच्यावर नुकताच शाब्दिक हल्लाबोल केला होता त्यावर शहर शिव सेनेचे माजी अध्यक्ष भरत मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये शरद थोरात यांचेवर कठोर शब्दात टीका केली आहे.
राज्यात नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपाला सावरणे कठीण जात असून त्यांनी आपल्या पराभवाची कारणे शोधताना आपल्या मित्रपक्षांना दुःखावण्याचा सपाटा लावला असून त्यातून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी आपल्याला कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदाचा शब्द देऊही असलेले असल्याचा आरोप नुकताच केला होता.त्यावर भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष शरद थोरात यांनी झावरे यांच्यावर नुकताच शाब्दिक हल्लाबोल केला होता त्यावर शहर शिव सेनेचे माजी अध्यक्ष भरत मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये शरद थोरात यांचेवर कठोर शब्दात टीका केली आहे.
त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे कि,ज्यांना पक्षाची निष्ठा माहित नाही त्याना राजेंद्र झावरे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही.त्यांनी केवळ आपल्या महिन्याला मिळणाऱ्या पाकिटाची चिंता करावी , आपलं वय व जेष्ठता पाहून आपल्या पुरतेच काम करावे मोठा घास घेऊ नये.जे आपल्या गावातील संत महंतांच्या वर्गणीतून आपला प्रपंच चालवितात त्याना टीका करण्याचा अधिकार पोहचत नाही.शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करण्या इतकी त्यांची लायकी नाही याचं भान ठेवावे.आपण प्रसिद्धीस दिलेल्या बातमीला आम्ही लगेच उत्तर देणार होतो मात्र आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्याने आपण तो दिवस जाणीवपूर्वक टाळला, कालचा दिवस आम्हां शिवसैनिकांसाठी शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदीन म्हणजे मौन पाळण्याचा दिवस होता..म्हणून तुमची लायकी पाहून उत्तर दिले नाही. आपण किती दिवस साखर सम्राटांनी हुजरेगीरी करणार आहे? ज्यांच्यावर आरोप करता ना त्यांचे योगदान कोपरगाव शहरासाठी आणि पक्षसंघटनेसाठी काय आहे त्याचा पहिला अभ्यास करावा.मगच उत्तर द्यावे. पाठीत खंजीर आम्ही खुपसायला तुमच्यासारखी लबांडाची जात आमची नाही.छातीत वार करायची शिवसैनिकाची आमची जात आहे.आरोप करताना भान ठेवावे असे आवाहनही त्यांनी थोरातांना उद्देशून शेवटी केले आहे.