जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बस वाहकाने दिव्यांगास केली मारहाण,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील रहिवाशी व पंच्याहत्तर टक्के अपंग असलेल्या रवींद्र कारभारी कोल्हे हे झगडेफाटा येथून कोपरगावला राज्य परिवहन मंडळाच्या बसने जाण्यास निघाले असता काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास डाऊच खुर्द फाट्यावर बस वाहकाकडे बसण्यास अपंगांची जागा मागीतल्याचा राग येऊन वाहक के.एस.वानखेडे यांनी त्याच्या श्रीमुखात भडकावल्या व त्या अपंगास पाठीत लाथ मारून खालू उतरून दिल्याने कोपरगाव तालुक्यात या बस वाहकाविरुद्ध नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.या बाबत सदर आपदग्रस्त व्यक्तीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

अपंग रवींद्र कोल्हे यांनी कोपरगावच्या दिशेने जाण्यासाठी त्या बसला मोठ्या आशेने हात केला बस थांबवली.पण त्यांच्या नशीबाच्या साडेसातीचे फेरे इथून पुढे सुरु झाले.त्यांनी बस वाहक के.एस.वानखेडे यांचेकडून आपले सवलतीच्या दरातील पाच रुपयांचे तिकीटही काढले मात्र गर्दी असल्याने व त्यांना आपल्या पाठीच्या मणक्याचा त्रास असल्याने त्यांनी बसच्या वाहकाला आपल्याला बसण्यासाठी जागेची आवश्यकता असल्याचे सांगून अपंगांची राखीव खुर्ची तथा बाकडे मिळावे अशी विनंती केली असता हे वाहक त्यांच्यावर चांगलेच भडकले व त्यांनी त्यांना शिवीगाळ तर केलीच पण त्यांच्या सरळ तीन श्रीमुखात लागवल्या व पुढील डाऊच खुर्द फाट्यावर उतरून देतांना त्यांच्या पाठीत आपल्या बुटासहित लाथ घालण्यास ते विसरले नाही.

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा मानली जाते.अनेक खेड्यापाड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणून राज्य परिवहन मंडळाची बसची देशभर ओळख आहे. आजारी व अपंग व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणूनही बसला ओळखले जाते.सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा असे आवाहन बस आगारात गेल्यावर भोंग्याद्वारे नक्कीच राज्यातील प्रवाशांनी या सूचना व आवाहन ऐकले असेल मात्र हे किती थोतांड आहे याचा दाहक अनुभव सध्या कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील अपंग तरुण रवींद्र कोल्हे यांना आला असून ते आपल्या गावावरून झगडे फाट्यावर अन्य वाहनाने आले असता मागून संगमनेर कडून कोपरगाव कडे जाणारी कोपरगाव आगाराची बस आल्यावर त्यांनी पुढील तालुक्याच्या दिशेने जाण्यासाठी त्या बसला मोठ्या आशेने हात केला बस थांबवली.पण त्यांच्या नशीबाच्या साडेसातीचे फेरे इथून पुढे सुरु झाले.त्यांनी बस वाहक के.एस.वानखेडे यांचेकडून आपले सवलतीच्या दरातील पाच रुपयांचे तिकीटही काढले मात्र गर्दी असल्याने व त्यांना आपल्या पाठीच्या मणक्याचा त्रास असल्याने त्यांनी बसच्या वाहकाला आपल्याला बसण्यासाठी जागेची आवश्यकता असल्याचे सांगून अपंगांची राखीव खुर्ची तथा बाकडे मिळावे अशी विनंती केली असता हे वाहक त्यांच्यावर चांगलेच भडकले व त्यांनी त्यांना शिवीगाळ तर केलीच पण त्यांच्या सरळ तीन श्रीमुखात लागवल्या व पुढील डाऊच खुर्द फाट्यावर उतरून देतांना त्यांच्या पाठीत आपल्या बुटासहित लाथ घालण्यास ते विसरले नाही.परिणाम स्वरूप बस निघुन गेल्यावर रवींद्र कोल्हे यांच्याकडे पुढील प्रवासाला पैसे नसल्याने त्यांना आपला कोपरगाव पर्यंतचा सर्व प्रवास पायी करावा लागल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

रवींद्र कोल्हे हे आपल्या उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेची कागदपत्रे जमविण्यासाठी प्रयत्नरत असताना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हि दुर्दवी घटना घडली आहे.त्यानां झालेल्या या मारहाणीमुळे ते मनातून पुरते हादरून गेले असून त्याना न्याय देण्याची गरज आहे.आता आगार प्रमुख काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

या अपंग व्यक्तीने या बाबत कोपरगावात आल्यावर कोपरगाव आगार येथील वाहतूक नियंत्रक यांच्याकडे तक्रार केली असता हे वानखेडे नामक वाहक तेथेही उपस्थित होते तेथून त्यांनी कोल्हे त्यांना मारण्याची धमकी दाखवून त्यांना तेथून पिटाळून लावले. त्यांनंतर त्यांनी आधी कोपरगाव तहसीलदार यांचेकडे या वाहकाची तक्रार केली व नंतर उशिराने त्याना त्यांच्या गावातील मात्र कोपरगाव येथे वकिली करत असलेल्या एका तरुण मित्राचे सहाय्य मिळाल्याने त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (580/2019) दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करीत आहेत. दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.नागरिकांनी या बेताल वाहकावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close