कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात आ.काळे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तालुक्यातील कोकमठाण येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
कोकमठाण येथील रामदासी महाराज मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,फळांचे वाटप करण्यात येऊन जागृत देवस्थान लक्ष्मीमाता मंदिरात आ.काळे यांच्या निरोगी आयुष्यासाठी कोकमठाण ग्रामस्थांच्या वतीने पूजा व धार्मिक कार्यक्रम करण्यात आले आहे.
कोकमठाण येथील रामदासी महाराज मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,फळांचे वाटप करण्यात येऊन जागृत देवस्थान लक्ष्मीमाता मंदिरात आ.काळे यांच्या निरोगी आयुष्यासाठी कोकमठाण ग्रामस्थांच्या वतीने पूजा व धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.यावेळी बोलतांना उपाध्यक्ष रोहोम म्हणाले की,”कोपरगावच्या विकासाचा वसा घेऊन वाटचाल करीत असलेल्या आ.काळे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर मतदार संघातील प्रत्येक गावात विकास पोहोचवला आहे.कोकमठाण गाव व परिसराचा देखील विकास करतांना रस्ते,पाणी,वीज आदि महत्वाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहे.तसेच जागृत देवस्थान लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास आ.काळे यांच्या प्रयत्नातून ‘क’ वर्ग दर्जा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. व त्याठिकाणी सभागृह बांधण्या संदर्भात सर्व ग्रामस्थांच्या संमतीने जागा निश्चितीसाठी पाहणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,सुदाम लोंढे, दिपक रोहोम,विजय रक्ताटे,बाळासाहेब राऊत,प्रसाद साबळे,ज्ञानेश्वर रक्ताटे,आबा रक्ताटे,अविनाश निकम,संजय दंडवते,जालिंदर हाडोळे,संतोष लोंढे,गोरक्षनाथ लोहकणे, महेश लोंढे,पंकज लोंढे,संजय थोरात,विजय रक्ताटे, सूनिल लोहकणे, सुनिल लोंढे, राजेंद्र रोहोम,ताराचंद रक्ताटे,संभाजी गायकवाड, बाळासाहेब पवार, संभाजी देशमुख अजित रक्ताटे,अल्लाउद्दिन सय्यद अंनत रक्ताटे,विशाल जाधव,दिपक कराळे,बंटी सय्यद,जानी धिवर,सुनिल साळुंके,ग्रामसेवक दिलीप गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थीत होते.