जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

लक्ष्मीनगर येथे रस्त्याचे काम निकृष्ट -नागरिकांची कोपरगाव पालिकेत तक्रार

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगरात बाळू दीक्षित घर ते धारणगाव रोड या रस्त्याचे नुकतेच झालेले काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट झाले असून त्याची चौकशी करून सदरचे काम पुन्हा दुरुस्त करावे अशी मागणी तेथील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे आज सकाळी अकराच्या सुमारास केली आहे.

त्यानी कोपरगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे कि,कोपरगाव नगरपरिषदेने नुकतीच निविदा प्रसिद्ध करून लक्ष्मीनगरात बाळू दीक्षित ते धारणगाव रोड हे काम लाखो रुपयें खर्चून केले आहे.सदरचे काम पालिका प्रशासनाने आपल्या देशरेखी खाली चांगले करणे गरजेचे असताना त्याकडे बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.ते त्यांनी जाणीवपूर्व केले कि डोळेझाक केली हे समजण्यास मार्ग नाही.सदर कामाची उंची अपेक्षित नाही.सदरचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झालेले नाही.आता काम होऊनही रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे.अनेक ठिकाणी सिमेंट निघून जात आहे.रस्त्यासाठी वापरलेली खडी निकृष्ट दर्जाची आहे.सदरच्या ठेकेदारास या बाबत समज देऊनही त्याने दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे या रस्त्याची कोपरगाव नगरपरिषद अधिकाऱ्यांनीं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा लक्ष्मीनगर येथील नागरिक आंदोलन करतील असा शेवटी इशारा दिला आहे.

निवेदनावर अनिल गायकवाड,राहुल कवरे, माधव आहेर,सागर सोमवंशी,दिनेश कांबळे,केदार वाणी,राजीव बोधक,संजय वाघ,सोमनाथ वडनेरे, राजेंद्र शिंगाडे,अशोक पवार,मंगल वैद्य,लक्ष्मण भाटे,शाहरुख शेख,आदींसह 98 नागरिकांनी सह्या केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close