कोपरगाव तालुका
महिलांचे सक्षमीकरण होणे हि आज काळाची गरज-कोपरगावात आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महिलांचे सक्षमीकरण होणे हि आज काळाची गरज बनली आहे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध डिझायनर सिमरन खुबानी यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा सुहासिनी कोयटे या महाराष्ट्रातील महिलांसाठी सहकार उद्यमीचा शिवण कले विषयी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून महिलांना प्रशिक्षित करीत असून महिलांना सक्षम बनविण्यासाठी सहकार उद्यमी विविध उपक्रम व रोजगार उपलब्ध करून देत आहे हि समाधानाची बाब आहे”-रीना जाधव,फॅशन डिझायनर.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी आयोजित मोफत शिवणकला प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ एस.एस.के.वार्डरोबच्या संचालिका व प्रसिद्ध फॅशन डिझायनर सिमरन खुबाणी यांच्या शुभहस्ते कोपरगाव येथील समता सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी प्रशिक्षक रिना जाधव,समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा व कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे आदी प्रमुख मान्यवर महिला उपस्थित होत्या.
सदर प्रसंगी समता महिला गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे म्हणाल्या कि,‘महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आजच्या धावपळीच्या युगात सक्षम बनविण्याचा प्रयत्न महिला सबलीकरण समितीच्या अध्यक्षा अॅड.अंजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रात करत आहोत. महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर विविध व्यवसायाचे ज्ञान असणे देखील तितकेच महत्वाचे असल्यामुळे शिवण कला क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान बचत गटातील महिलांना अवगत व्हावे यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज दिवसभर सर्व महिलांनी याविषयी परिपूर्ण ज्ञान अवगत करावे सिमरन खुबाणी या कोपरगावातील महिलांनाच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व महिलांना आदर्श आहे. त्यांनी फॅशन डिझायनींग चा अत्याधुनिक व्यवसाय कोपरगावात सुरु केलेला असून त्या फॅशन डिझायनींगच्या माध्यमातून महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन देखील करत असतात.
सदर प्रसंगी औरंगाबाद येथील फॅशन डिझायनर व प्रशिक्षक रिना जाधव म्हणाल्या कि,‘महाराष्ट्रातील महिलांसाठी सहकार उद्यमीचा शिवण कला विषयी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून महिलांना प्रशिक्षित करीत असून महिलांना सक्षम बनविण्यासाठी सहकार उद्यमी विविध उपक्रम व रोजगार उपलब्ध करून देत आहे.आम्ही महिला देखील शहराबरोबरच ग्रामीण भागातील प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना घरोघरी जाऊन प्रशिक्षण देऊ.
शिबिराच्या उद्घाटक सिमरन खुबाणी,प्रशिक्षिका रिना जाधव यांचा सत्कार व सन्मान समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे यांनी केला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि प्रमुख उद्घाटक व प्रशिक्षकांचा परिचय कु.रेणुका मुन्शी यांनी करून दिला. शिबीर यशस्वीतेसाठी सहकार उद्यमी आणि समता महिला बचत गटाचे कर्मचारी,समता महिला बचत गटाच्या महिला आदींनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरास शहरातील व ग्रामीण भागातील महिलांचा मोठा सहभाग होता.