कोपरगाव तालुका
निकालाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखा-पो.नि.मानगावकर
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद नुकताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाला असून त्याचा निकाल घोषित होणार असल्याने या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निकालाचा आदर राखत कोपरगाव शहरात जनतेने शांतता व सुव्यवस्था अबाधित राखावी असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नुकतेच केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद नुकताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाला असून त्याचा निकाल येत्या 9 नोव्हेंबर रोजी घोषित होणार असल्याची शक्यता असल्याने राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शांतता समितीची बैठक संपन्न झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद नुकताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाला असून त्याचा निकाल येत्या 9 नोव्हेंबर रोजी घोषित होणार असल्याची शक्यता असल्याने राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शांतता समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे हे होते.
सदर प्रसंगी कोपरगाव येथील जेष्ठ कार्यकर्ते फकीर सय्यद,ऍड. ए. जी.दारुवाला,सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे, नवाज कुरेशी,आदी मान्यवरांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
दरम्यान या राष्ट्रीय स्तरावर महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बैठकीकडे शहरातील बहुतांशी सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे त्या बाबत एका जबाबदार अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी हि बैठक केवळ शांतता समितीची,नगरसेवक व धार्मिक गुरूंची व पत्रकारांची होती बाकी माणसांना बोलावले नव्हते असे सांगितले आहे.
त्यावेळी ते म्हणाले कि,राम मंदिराच्या जागेच्या वादाच्या याचिकांवर सुनावणी नुकतीच संपन्न झाली आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी २३ दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.हा निकाल 9 नोव्हेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता असल्याने दक्षता घेणे हे प्रशासनाचे काम आहे.या खेरीज आगामी काळात शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक जयंती,मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण आहे भारताचे सामाजिक ऐक्य अबाधित ठेवणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.न्यायालयाच्या निकालाचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.त्या बाबत सर्वांनी सहकार्य करावे.असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी उपस्थितांना शांततेचे आवाहन केले आहे.या वेळी उपास्थितांचे स्वागत व प्रास्तविक सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक भारत नागरे यांनी केले आहे.त्यावेळी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.