कोपरगाव तालुका
उपनगराध्यक्षपद टिकविण्यासाठी विकास कामांचा बळी-गटनेत्याची टीका
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील २८ विविध विकास कामांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशाला उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्वतःचे व कोल्हे गटाचे हसे करून घेतले असून त्यांचा हा उद्योग केळवण आपले पद टिकविण्यासाठी केलेला उद्योग असल्याची टीका कोपरगाव नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके यांनी आज एका बैठकीत बोलताना केली आहे.कोपरगाव शहरात आपल्याच प्रभागातील रस्त्यांची २८ कामे नामंजूर करणाऱ्या कोल्हे गटाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला औरंगाबाद खंड पिठात आव्हान दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“कोल्हे गटाने विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यावर खंडपीठात जाणे म्हणजे विकासकांमाचा बळी मानला जात आहे.तुमचा विरोध राजकारणाच्या मर्यादित ठेवा त्याचे नख विकासकामा लागू देऊ नका.आजपर्यंत कोपरगावच्या विकासाच्या इतिहासात अशी नोंद झालेली नाही तो विक्रम आता कोल्हे गटाच्या नावावर नोंदवला जाईल.हि विकास कामे काही कोणाच्या खाजगी मालमत्तेतून होणार नव्हती”कलविंदर दडियाल,शहराध्यक्ष शिवसेना कोपरगाव शहर.
कोपरगाव नगरपरिषदेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विविध रस्त्यांसह अठ्ठावीस कामे राजकीय कारणातून अडवून धरल्याने याबाबत वाद नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी साधारण फेब्रुवारी महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे नेला होता.त्या बाबत सुनावणी पूर्ण झाली होती त्या बाबतचा निकाल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दि.२३ मार्च रोजी जाहीर केला होता.त्या बाबत कामाचे आदेश संबंधित ठेकेदारांना होऊन त्यांनी जवळपास बहुतेक कामांना प्रारंभ केला होता.मात्र अस्वस्थ कोल्हे गटाच्या हा विषय पचनी पडला नाही व त्यांनी या बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्या निकालाला दि.२५ जून रोजी आव्हान दिले आहे.व त्या स्थिगितीचे आदेश नगरपरिषदेचे कोल्हे गटाचे पदाधिकारी व माजी पदाधिकारी यांनी या आदेशाची प्रत ३० जून रोजी स्वहस्ते दिली आहे.त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे.त्याबाबत आगामी २३ जुलै रोजी सुनावणी होणार असून या पार्श्वभूमीवर आज गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात आज शहर राष्ट्रवादीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.त्या वेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,सेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,तालुकाध्यक्ष अनिल गाडेकर,नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,सेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे.अड्.विद्यासागर शिंदे,राजेंद्र वाकचौरे,फकीर कुरेशी,दिनकर खरे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”विकासकामानां विरोध केल्याने त्यांची मूळ प्रवृत्ती दिसून आली आहे.त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही हे उघड झाले आहे.आगामी निवडणूक डोळयांसमोर ठेऊन त्यांनी हा खोडा घातला असला तरी त्यांच्या हाती काहीही लागणार नाही.जनतेला खरे विकासाचे हितछत्रू कोण आहे हे कळून चुकले आहे.त्यामुळे त्यांची शहर व तालुक्यात अप्रतिष्ठा होईल व त्यांना आगामी काळात किंमत मोजावी लागणार आहे.हि कामे विधीज्ञ विद्यासागर शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर दावा चालला असताना त्याबाबत जोरदार मांडणी केली होती.त्यामुळे नगरपालिकेच्या बाजूने निकाल लागला होता.त्यावर या याचीकेने पाणी फिरविण्याचे काम केले आहे.मात्र राष्ट्रवादी पक्ष आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गप्प बसणाऱ्यांपैकी नाही हि बाब ते विसरले असल्याचेही ते शेवटी म्हणाले आहे.सदर प्रसंगी शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी,”कोल्हे गटाने विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यावर खंडपीठात जाणे म्हणजे विकासकांमाचा बळी मानला जात आहे.तुमचा विरोध राजकारणाच्या मर्यादित ठेवा त्याचे नख विकासकामा लागू देऊ नका.आजपर्यंत कोपरगावच्या विकासाच्या इतिहासात अशी नोंद झालेली नाही तो विक्रम आता कोल्हे गटाच्या नावावर नोंदवला जाईल.हि विकास कामे काही कोणाच्या खाजगी मालमत्तेतून होणार नव्हती..इतक्या नीच पातळीवर जाण्याची गरज नव्हती.येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांचे स्थान दाखवून देईल.या कृतीने शहराचे मोठे नुकसान झाले आहे असेही ते शेवटी म्हणाले आहे.
तर यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांनीही कोल्हे गटाला फैलावर घेतले आहे.विकास कामांना खोडा घालून त्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे.जेष्ठ नेते काळे-कोल्हे या नेत्यांनी असे गलिच्छ राजकारण केले नाही.मात्र दुसरी पिढी मात्र घसरली आहे.त्यामुळे राजकीय नुकसानी बरोबर शहराचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे,सुनील गंगूले,मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,भरत मोरे, यांनीही आपले मनोगत व्यक्त करून कोल्हे गटाचा निषेध व्यक्त केला आहे.या प्रसंगी अड्.शिंदे यांनी कायदेशीर बाजू भक्क्म असून या प्रकरणी उच्च न्यायालयातही दाद मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.उपस्थितांचे सुनील शिलेदार यांनी आभार व्यक्त केले आहे.