कोपरगाव तालुका
..या जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक प्रगती जिल्ह्यासाठी दिशादर्शक-क्षीरसागर
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणातून संस्कारक्षम पिढी निर्माण करणाऱ्या शिक्षण संस्था निर्माण होण्याची नितांत गरज आहे. ही काळाची पावले ओळखून संवत्सर जिल्हा परिषदेच्या शाळेने केलेली शैक्षणिक प्रगती जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारी आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.
संवत्सर येथील संवत्सर ते मनाई रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमीपूजन,महानुभाव आश्रम ते शृंगेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर तसेच स्मशानभूमी परिसरातील वृक्षारोपन,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमीपूजन,प्राणवायू वृक्षसंवर्धन उपक्रमाचे उदघाटन,जिल्हा परिषद शाळेतील डिजीटल सॉफ्टवेअर सिस्टीमचा शुभारंभ,नवीन दोन शाळा खोल्या बांधकामाचे भूमीपूजन,शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपन,गरजू व गरीब मुलींना सायकलींचे वाटप असे विविध कार्यक्रम यावेळी पार पडले.
गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक,दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांच्या सतराव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,अध्यक्षस्थानी होत्या.प्राथमिक शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी शिवाजीराव शिंदे,माध्यमिक शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी रामदास हराळ,श्रीगोंदा तालुक्याचे शिक्षणाधिकारी अनिल शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कोपरगांव तालुका गट शिक्षणाधिकारी पोपटराव काळे,शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे,खंडू फेफाळे,भरत बोरनारे,अनिल आचारी,सुभाष डरांगे, बाळासाहेब दहे,सोमनाथ निरगुडे,दिलीराव ढेपले,राजेंद्र ढेपले,लक्ष्मणराव परजणे,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक फैयाजखान पठाण यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
संवत्सर गांव हे सर्व सुविधांनी समृध्द आहे.ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत,दवाखाना,गांवातील स्वच्छता,गावांतर्गत रस्ते,पाणी पुरवठ्याची सुविधा, शाळा आणि शाळेतील उपक्रम जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारे आहेत. असे उपक्रम जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात राबविले जावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या स्तरावरुन प्रयत्न केले जातील. १९९६ साली मी कोपरगांव तालुक्यात प्रशिक्षणार्थी म्हणून आलो असता स्वर्गीय नामदेवराव परजणे यांच्या कार्याची मला जवळून ओळख झालेली आहे.गांवाच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेला ध्यास आज खऱ्या अर्थाने पूर्णत्वास आला आहे असे सांगून शैक्षणिक प्रगतीसाठी आग्रही भूमिका घेणारे राजेश परजणे पाटील यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री क्षीरसागर यांनी संवत्सरमधील विविध कामांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.शालिनी विखे पाटील यांनीही मार्गदर्शन केले.ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केलेत.