जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील स्व.नामदेवराव परजणे हे नामदेवरावच !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

अनन्यसाधारणत्व किंवा अभिजनवाद हि मानवाची आदिम भावना,कळपांचे समाज बनले तरी तिचे अस्तित्व सार्वत्रिक आहे.धास्ती हि शक्तीमानांच्या मनातच सर्वाधिक असते.असे समाजशास्त्र सांगते.याचे कारण काय असावे ? शक्ती हि बहुतेकदा अजेयत्वाकडे नेते पण त्या अजेंयत्वात उद्दीष्टपूर्तीचा पूर्णविराम सापडू शकत नाही.जितके अधिक घ्याल तितके कमी पडेल कॉर्पोरेट क्षेत्रात,राजकारणात,क्रीडा क्षेत्रात अभिनजांचे कंपू तयार होतात त्याच मुळे.नगर जिल्हा, कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.

उक्ती आणि कृती यांचा अमंगळ मेळ असलेले व्यक्तिमत्व असलेले नेते म्हणून स्व.नामदेवराव परजणे यांनी तालुक्यात आपली छाप सोडली होती.ती अखेरपर्यंत टिकून होती.त्यावेळी ज्या मंत्री कोल्हेचा दरारा होता.त्यांच्या नजरेस नजर देण्याचे धाडस ज्या काही काही बोटावर मोजण्याइतक्या नेत्यांत होता त्यात त्यांचा समावेश होता.किंबहुना नामदेवराव हे नामदेवरावच होते.त्यामुळे त्यांचा तालुक्यात विशेष चाहता वर्ग होता.तो अजून अपर्यंत टिकून आहे हे विशेष !

राज्यात साठच्या दशकात स्थापन झालेला सहकाराने या जिल्ह्यात खूप काही दिले आहे.हे नाकारता येणार नाही.पण त्यांचे रूपांतरण मात्र काही संस्थानात झाले आहे.त्याचा पाझर जनसामन्यात होण्याची गरज होती ती अपूर्ण राहिली आहे.ती पूर्ण व्हावी अशी विचारधारा असणाऱ्यात कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील मूळ राहिवाशी असलेले व तत्कालीन राज्य सरकारात वजनदार मंत्री असलेले शंकरराव कोल्हे यांचे निष्ठावान सहकारी असलेले कार्यकर्ते म्हणून ज्यांनी आपली ओळख कोपरगाव तालुक्यात व नगर जिल्ह्यात निर्माण करण्यात मिळवले होते ते स्व.नामदेवराव परजणे हे आज आपल्यात नाही यावर खरं तर आजही विश्वास बसत नाही.त्यांना जाऊन सतरा अवर्ष झाली हे पचवने अवघडच.मध्यम सडपातळ बांधा,डोक्यावर तितक्याच कडक असलेली निफाड छाप असलेली गांधी टोपी,वर त्याच स्वच्छतेचा पांढरा सफेद पण कडक इस्त्री असलेला गणवेश,स्वाभिमानी बाणा,पराकोटीचे शिस्तप्रिय,नजरेत जरब,सेवेस धावून जाण्याची सवय,कार्यकर्त्यांना समजून घेण्यात हातखंडा हि त्यांची खास वैशिष्ट्ये होती.उक्ती आणि कृती यांचा अमंगळ मेळ असलेले व्यक्तिमत्व असलेले नेते म्हुणून त्यांनी तालुक्यात आपली छाप सोडली होती.ती एक अखेरपर्यंत टिकून होती.त्यावेळी ज्या मंत्री कोल्हेचा दरारा होता.त्यांच्या नजरेस नजर देण्याचे धाडस ज्या काही काही बोटावर मोजण्याइतक्या नेत्यांत होता त्यात त्यांचा समावेश होता.किंबहुना नामदेवराव हे नामदेवरावच होते.त्यामुळे त्यांचा तालुक्यात विशेष चाहता वर्ग होता.तो अजून पर्यंत टिकून आहे हे विशेष ! कोपरगाव तालुक्यात तो पर्यंतच राजकीय ताळमेळ होता असे म्हटलं ते वावगे होणार नाही.त्या नंतर तालुक्यात “कार्यकर्ता” या शब्दाची जी घसरण झाली ती आतापर्यंत तरी थांबण्याचे नाव घेत नाही.वर्तमान अस्वस्थ असले आणि भविष्याची खात्री नसली की भूतकाळ महान वाटू लागतो असा वर्तमान काळ आहे.त्या काळात ‘जो’ कार्यकर्त्यांचा सन्मान होता ‘तो’ आता राहिला नाही.याची खंत आजही प्रत्येकाला वाटत असल्यास नवल नाही.”कोपरगाव तालुक्यात विधानसभेत जो पर्यंत परिवर्तन होत नाही व परजणे यांचा विजय होत नाही तो पर्यंत आपल्या पायात चप्पल घालणार नाही” असे म्हणणारे र.फ.शिंदे सारखे कार्यकर्ते त्याच काळात शोभून दिसत होते आज नाही.त्यामुळे पक्षविरहित अनेक कार्यकर्ते त्यांना मानत होते.त्या सर्वांना सन्मानाची वागणूक मिळणे बंद झाले आणि नामदेवराव परजणे यांनी संधी शोधण्यास प्रारंभ केला.तो काळ शिर्डी विधानसभेच्या पोट निवडणुकीचा १९९७ चा होता.आपल्याला अव्हेरले जात आहे.व अदखलपात्र केले जात आहे.हे चाणाक्ष नामदेवरांवाच्या नजरेतून सुटले नाही.संधी साठी थांबून रहाणे याला राजकीय चातुर्य म्हणत नाहीत.तर संधी निर्माण करावी लागते आणि ती आपले पारडे जड करणारी ठरेल याची काळजी घ्यावी लागते.ती त्यांनी पुरेपूर घेतल्यानेच आज त्यांच्या गटाचे वैभव तालुक्यात शिखरावर गेलेले पाहावयास मिळत आहे हे विसरता येणार नाही.त्यांचा वारसा आज गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष व त्यांचे सुपुत्र राजेश परजणे हे समर्थपणे चालवत आहे.त्यांना राजेंद्र जाधव व अन्य सहकारी साथ देत आहे.

अमेरिकी अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी म्हटले होते,”देशाला प्रयोगशील असण्याची गरज आहे.एखादी पद्धत वापरून पहा.जर ती यशस्वी झाली तर मोकळेपणाने मान्य करा आणि पुढे जा,मला वाटते याला फार बुद्धीमत्तेची गरज नाही पण प्रयत्न करत रहाणे हे सर्वात महत्वाचे आहे” आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते व सुपुत्र राजेश परजणे यांचा राजकीय व दुग्ध प्रक्रिया उद्योगाचा प्रवास सुरु आहे.तो नक्कीच फलद्रुप होईल यात संशय नाही. त्यांच्या विचारांची बांधिलकी आजही टिकवणे हि काळाची खरी गरज आहे.मर्यादे पलिकडील प्रतिक्रिया आणि सर्वसाधारण दडपशाही हि लोकशाहीस दहशत वादापेक्षाही अधिक गंभीर धोका,आव्हान निर्माण करते.हा तालुक्यातील धोका कमी करण्याचे वर्तमानात मोठे आव्हान आहे.ते स्व.नामदेवराव परजणे यांची विचारधारा चालविणारे राजेश परजणे व त्यांचे समर्थक कार्यकर्ते नक्कीच पेलतील असा त्यांच्या स्मृतिदिनी सार्थ विश्वास वाटतो.आज त्यांच्या सतराव्या पावन स्मृती दिनी विनम्र अभिवादन !

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close