कोपरगाव तालुका
कोपरगाव मतदार संघात 69.4 टक्के मतदान,कुठेही अनुचित प्रकार नाही
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघात सकाळी मंद गतीने सुरुवात झालेल्या मतदानास दुपारी चांगलाच वेग येऊन सायंकाळी सहाच्या सुमारास एकूण 2 लाख 64 हजार 388 मतदारांपैकी 1 लाख 83 हजार 803 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.त्याची टक्केवारी 69.4 टक्के मतदान झाले असून हि आकडेवारी विक्रमी मानली जात आहे.दरम्यान मतदार संघात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज राज्यात मतदान संपन्न झाले आहे.राज्यात औरंगाबाद,जालना,अमरावती आदी ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या असल्या निवडणुकीस गालबोट लागले असले तरी कोपरगाव विधानसभा मतदार संघात मात्र मतदान शांततेत संपन्न झाले आहे.तथापि काळ पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची शेती कामे बंद राहिल्याने मतदानाची आकडेवारी वाढली आहे व वाढणारी आकडेवारी सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढवीत असतात असे यापूर्वीचे अनुभव आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज राज्यात मतदान संपन्न झाले आहे.राज्यात औरंगाबाद,जालना,अमरावती आदी ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या असल्या निवडणुकीस गालबोट लागले असले तरी कोपरगाव विधानसभा मतदार संघात मात्र मतदान शांततेत संपन्न झाले आहे.कोपरगाव मतदारसंघात सकाळी 9 वाजे पर्यंत 12 हजार 355 (4.67 % ) मतदारांनी आपला धिम्यागतीने मतदान संपन्न झाले त्याची गती अकरा वाजेच्या सुमारास वाढून 41 हजार 905 (15.82 %) झाले होते.तर दुपारी एक वाजता दुपटीने गती येऊन ते 85 हजार 671 (32.35 %) नोंदवले गेले होते.दुपारी तिनच्या सुमारास हीच आकडेवारी वाढून 1 लाख 32 हजार 321 म्हणजेच ( 49.96 % ) नोंदवली गेली होती.तर सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास हीच आकडेवारी मोठ्या प्रमाणावर वाढून 1 लाख 77 हजार 828 (67.15 %) इतकी नोंदवली गेली होती.सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मात्र मतदान प्रक्रिया मंदावून ती 1 लाख 83 हजार 803 (69.4 %) नोंदवली गेली आहे.यात 94 हजार स्रिया तर 88 हजार 934 पुरुष मतदारांचा तर 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.त्यामुळे आता भाजपच्या आ. स्नेहलता कोल्हे,राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे,अपक्ष उमेदवार तथा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने व वंचित आघाडीचे अशोक गायकवाड यांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे.खरी चुरस या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे व अपक्ष उमेदवार विजय वहाडणे यांच्यातच पाहावयास मिळाली असून आ. कोल्हे व राजेश परजणे हे उमेदवारही चांगले मते घेणार आहे तरी सत्ताधारी गटाची आमदारकी मात्र धोक्यात असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.या निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार अशोक गायकवाड हे काय करामत करतात या कडेही राज्याचे लक्ष लागून आहे.मतदान सर्वत्र शांततेत पार पडले असले तरी त्याचे स्रेय पोलीस यंत्रणा व निवडणूक अधिकारी राहुल मुंडके,सहाय्यक निवडणूक अधिकारी योगेश चंद्रे,प्रशांत सरोदे याना द्यावे लागणार आहे.