कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील आशा सेविकांच्या विविध मागण्याचे निवेदन सुपूर्त
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील आशा सेविकांनी नुकतेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आ.आशुतोष काळे यांना दिले आहे.आशा सेविकांच्या अडचणी शासनदरबारी मांडू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
आ.आशुतोष काळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देतांना कोपरगाव तालुक्यातील आशा सेविका.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आशाचा उपयोग होतो.आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही आशावर असते मात्र त्यांना फारच थोडा मोबदला देण्यात येतो त्या साठी त्यांना अधिकचे मानधन व अन्य सुविधा देणे गरजेचे आहे.त्यासाठी त्यांनी आपल्या मागण्या सरकारी दरबारी मांडण्यासाठी आ.काळे यांचेकडे मागणी केली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आशाचा उपयोग होतो.ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा या मध्यस्थीचे काम करतात.गैर-आदिवासी भागात १५०० लोकसंख्येमागे एक आशा तर आदिवासी भागामध्ये हजार लोकसंख्येमागे एक आशा नियुक्त करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता,लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते.त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही आशावर असते मात्र त्यांना फारच थोडा मोबदला देण्यात येतो त्या साठी त्यांना अधिकचे मानधन व अन्य सुविधा देणे गरजेचे आहे.त्यासाठी त्यांनी आपल्या मागण्या सरकारी दरबारी मांडण्यासाठी आ.काळे यांचेकडे मागणी केली आहे.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जिल्हा आय टक सचिव नीता भोसले,गट प्रवर्तक निर्मला इंगळे, सुनंदा सोनवणे,सीमा धेनक,शीतल म्हस्के,ज्योती खंडीझोड,सुषमा कपाटे,सीमा इंगळे,गायत्री भुजाडे,अमृता गव्हाणे,ज्योती औताडे,आशा सेविका सपना दाभाडे,आर.एस.धोक्रट,नीता परदेसी,सुनिता चोरगे,मनीषा वैद्य,नलिनी आजगे,सीमा वलटे,राजश्री साबळे,चंद्रकला गुंजाळ,सुनिता खंडीझोड,मनीषा त्रिभुवन,योगिता पवार,रोहिणी लोखंडे,रंजना भड,शीतल गायकवाड,शशिकला सूरभैया,सविता वाघ,सुषमा वाघ,कल्पना शिंदे आदींसह आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.