कोपरगाव तालुका
कोपरगावचे पोलीस निरीक्षक देसले यांचा गौरव
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तहसील कार्यालय कोपरगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा शुभारंभ नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला असून त्यात दुसऱ्या कोरोना लाटेत विशेष कामगिरी केल्याबद्दल कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांची नेमणूक झाल्यापासून त्यांनी कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर आपले कर्तव्य चोख बजावले आहे.त्यांचा त्या निमित्त हा सत्कार करण्यात आला आहे. या सत्काराबद्दल पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी समधनव व्यक्त केले आहे.
१९९३ साली ओरिसाच्या चक्रीवादळानंतर व २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा बनवण्याची निकड सरकारला कळून चुकली.२०१९ साली आलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत हा कायदा लागू करण्यात आला.त्यानुसार हि कार्यालयाने सुरु करण्यात आलेली आहेत.कोपरगावात हे कार्यालय नुकतेच सुरु अकरण्यात आले आहे.त्यावेळी तालुका राष्ट्रवादीच्या वतीने दुसऱ्या कोरोना लाटीत महत्वपूर्ण भूमिका निउभावणाऱ्या कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनाही गौरविण्यात आले आहे.
सदर प्रसंगी प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलगंगूले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे, मेहमूद सय्यद,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी आदी उपस्थित होते.