कोपरगाव तालुका
भाजप शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणारे सरकार- आशुतोष काळेंची टीका
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
राज्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन निर्णय घेणारे सरकार जनतेने निवडून दिले तर पाच वर्ष पच्छाताप करण्याची वेळ येईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी संवत्सर येथे एका प्रचार सभेत बोलतांना दिला आहे.
विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपली असून प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे.कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ संवत्सर येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. तालुक्याच्या आमदार रस्त्यांसाठी निधी आणल्याच्या वल्गना करतात त्यावेळी त्यांना पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे पर्यंत खराब झालेला नागपूर मुंबई हा रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. या रस्त्याने आजपर्यंत अनेकांचे बळी घेतले, काहींना कायमचे अपंगत्व आले. खराब रस्त्यामुळे परिसरातील व्यवसाय लयाला गेले आहे.याला तालुक्याच्या आमदार जबाबदार आहेत.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,तालुकाध्यक्ष मच्छीन्द्र खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगूले,कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे,माजीउपाध्यक्ष कारभारी आगवन,सुनील शिंदे,आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती होती. मोठ्या प्रयत्नातून गोदावरी नदीवरील बंधाऱ्यामध्ये पाणी साठविले होते. परंतु पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्तात या बंधाऱ्याचे पाणी खाली सोडून देण्यात आले त्यावेळी नेहमीच जलसंपदा मंत्र्यांना निवेदन देतानाचे फोटो काढणाऱ्या तालुक्याच्या आमदार हे खाली सोडण्यात आलेले पाणी उघड्या डोळ्यांनी पाहत होते.त्याचा मोठा फटका गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना बसला. मागील ५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेती मालाला अपेक्षित दर मिळत नव्हता त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत होते. मागील वर्षी तर कांदा शेतकऱ्यांना उखाडयावर टाकून द्यावा लागला होता. यावर्षी कांद्याला बऱ्यापैकी भाव असतांना हे भाव कमी कसे होतील व शेतकऱ्यांचे नुकसान कसे होईल असे चुकीचे निर्णय या शासनाने घेतले यावेळी शासनाच्या प्रतिनिधी असलेल्या तालुक्याच्या आमदार शेतकऱ्यांच्या बाजूने शासनाच्या विरोधात का भांडल्या नाहीत याचे उत्तर मतदारांनी त्यांना विचारायला पाहिजे. ज्यावेळी संवत्सर व परिसरातील नागरिकांच्या रेल्वे प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर असलेले संवत्सर रेल्वे स्टेशन बंद करण्यात आले त्यावेळी तालुक्याचे आमदार कुठे होते. तालुक्याच्या आमदार रस्त्यांसाठी निधी आणल्याच्या वल्गना करतात त्यावेळी त्यांना पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे पर्यंत खराब झालेला नागपूर मुंबई हा रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. या रस्त्याने आजपर्यंत अनेकांचे बळी घेतले, काहींना कायमचे अपंगत्व आले. खराब रस्त्यामुळे परिसरातील व्यवसाय लयाला गेले आहे.याला तालुक्याच्या आमदार जबाबदार आहेत.
कोपरगाव तालुक्याच्या आमदार रस्त्यांसाठी निधी आणल्याच्या वल्गना करतात त्यावेळी त्यांना पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे पर्यंत खराब झालेला नागपूर मुंबई हा रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. या रस्त्याने आजपर्यंत अनेकांचे बळी घेतले, काहींना कायमचे अपंगत्व आले. खराब रस्त्यामुळे परिसरातील व्यवसाय लयाला गेले आहे.याला तालुक्याच्या आमदार जबाबदार आहेत-काळे
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,तालुकाध्यक्ष मच्छीन्द्र खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगूले,कारखान्याचे संचालक सचिन रोहमारे,माजीउपाध्यक्ष कारभारी आगवन,सुनील शिंदे,आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती होती. मोठ्या प्रयत्नातून गोदावरी नदीवरील बंधाऱ्यामध्ये पाणी साठविले होते. परंतु पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्तात या बंधाऱ्याचे पाणी खाली सोडून देण्यात आले त्यावेळी नेहमीच जलसंपदा मंत्र्यांना निवेदन देतानाचे फोटो काढणाऱ्या तालुक्याच्या आमदार हे खाली सोडण्यात आलेले पाणी उघड्या डोळ्यांनी पाहत होते.त्याचा मोठा फटका गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना बसला. मागील ५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेती मालाला अपेक्षित दर मिळत नव्हता त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत होते. मागील वर्षी तर कांदा शेतकऱ्यांना उखाडयावर टाकून द्यावा लागला होता. यावर्षी कांद्याला बऱ्यापैकी भाव असतांना हे भाव कमी कसे होतील व शेतकऱ्यांचे नुकसान कसे होईल असे चुकीचे निर्णय या शासनाने घेतले यावेळी शासनाच्या प्रतिनिधी असलेल्या तालुक्याच्या आमदार शेतकऱ्यांच्या बाजूने शासनाच्या विरोधात का भांडल्या नाहीत याचे उत्तर मतदारांनी त्यांना विचारायला पाहिजे. ज्यावेळी संवत्सर व परिसरातील नागरिकांच्या रेल्वे प्रवासासाठी अतिशय सोयीस्कर असलेले संवत्सर रेल्वे स्टेशन बंद करण्यात आले त्यावेळी तालुक्याचे आमदार कुठे होते. तालुक्याच्या आमदार रस्त्यांसाठी निधी आणल्याच्या वल्गना करतात त्यावेळी त्यांना पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे पर्यंत खराब झालेला नागपूर मुंबई हा रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. या रस्त्याने आजपर्यंत अनेकांचे बळी घेतले, काहींना कायमचे अपंगत्व आले. खराब रस्त्यामुळे परिसरातील व्यवसाय लयाला गेले आहे.याला तालुक्याच्या आमदार जबाबदार आहेत.
कोपरगावच्या आमदारही शेतकरी विरोधी असून त्यांनी शेतकऱ्यांचा संप मोडून शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले आहे अशा आमदारांच्या भूलथापांना बळी न पडता २०१४ ला झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होऊ न देता शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी निवडून देऊ नका नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल- काळे
ज्यावेळी आपला कोपरगाव तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला गेला त्यावेळी माझ्याबरोबर अनेक शेतकरी आमरण उपोषणाला बसले म्हणून शासनाने दहेगाव मंडल दुष्काळाच्या यादीत सामाविष्ट केले. माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे यांनी नेहमीच संवत्सर व परिसरात असलेल्या गावांवर प्रेम केले आहे. त्यांच्या आदर्श विचारांवर माझी वाटचाल सुरु असून ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांवर अन्याय झाला त्या वेळी आवाज उठविला आहे. राज्य व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी असून भूलथापा देणारे सरकार आहे. आमदारांचे काय काम असते हे ५ वर्षे तालुक्याच्या आमदारांना समजलेच नाही त्यामुळे कोपरगाव तालुका विकासाच्या बाबतीत १० वर्षे मागे गेला असून एकदा सेवा करण्याची संधी द्या तुमच्या मनातील सर्व अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी शेवटी उपस्थितांना दिला आहे.