कोपरगाव तालुका
कोपरगावात राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त औषध फवारणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित कोपरगाव शहर राष्ट्रवादीने कोपरगाव शहर कोरोनामुक्त करण्यासाठी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने माझा प्रभाग,माझी जबाबदारी हा उपक्रम आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आला आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे.मागील आठ दिवसापासून हा उपक्रम नियमितपणे सुरु असून प्रभाग क्रमांक ८ व ३ मध्ये नुकतीच आहे. औषध फवारणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या साथीने इ.स.१९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला आहे कोपरगाव तालुक्यात आता तो आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या साथीने इ.स.१९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला.आता या पक्षाने शिवसेनेशी घरोबा केलेला आहे.त्यांचा उद्या वर्धापन दिन संपन्न होत आहे.त्यानिमित्त कोपरगाव शहरात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कोपरगाव शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढलेला संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता व बाधित रुग्णांची संख्या देखील वाढली होती.मात्र आ.काळे यांनी केलेल्या उपाय योजनांमुळे रुग्णसंख्येला उतार लागला लागल्याचा दावा केला असून शहरात मोठ्या संख्येने आढळणारी बाधित रुग्णांची संख्या एकवर आली असल्याचे म्हटले आहे.हि परिस्थिती कायमस्वरूपी राहून शहरवासियांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोपरगाव शहरात प्रत्येक प्रभागात औषध फवारणी करण्यात येत आहे. आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त औषध फवारणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून शहारत सुरु झालेले अनलॉक व कमी झालेल्या रुग्णसंख्येमुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,रमेश गवळी,राजेंद्र आभाळे,दिनकर खरे,अरुण शेळके,बाला गंगुले,गुरु पठाण,विक्रम वाळूंज,महेंद्र कटारनवरे,संतोष शेजवळ,गौतम गोरे,ऋषीकेश खैरनार,शंकर सोनपसारे, राजेंद्र कोपरे,सुरेश आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते