जाहिरात-9423439946
कृषी विभाग

कोपरगाव कृषी विभागामार्फत मोफत बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव पंचायत समितीच्या वतीने केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजने अंतर्गत चांगल्या दर्जाच्या बियाणांचे वाटप नुकतेच सोयाबीन,बाजरी,मका,तूर आदी बियाणांचे वाटप कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने व उपसभापती अर्जुनराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले आहे.

“मागील वर्षी या अभियानाअंतर्गत १०५.०० क्विंटल बियाणांचे वाटप करण्यात आले होते.यावर्षी त्यामध्ये वाढ होवून २३६.५० क्विंटल सोयाबीन बियाणाचे वाटप करण्यात आले.सोयाबीनला चालू वर्षी उच्चांकी दर मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहे”-अर्जुन काळे,उपसभापती पंचायत समिती कोपरगाव.

केंद्र सरकार पुरस्कृत सन २००७-०८ पासून राज्यात अन्न सुरक्षा अभियान राबवले जात आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला शेतीच्या लागवडीसाठी आवश्यक असणारी बियाणे पुरवत असून त्या अंतर्गत बियाणे चांगल्या दर्जाचे असतील तर शेतीतून निघणारे उत्पन्न हि त्याच प्रतीचे असणार त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी हि योजना काढली आहे.त्या अंतर्गत हि योजना राबविण्यात आली आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम,पंचायत समिती सदस्य,राहुल जगधने,सुधाकर होन,प्रसाद साबळे,विठ्ठल जावळे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन,चांगदेव जवने,माधुरी गावडे,मनोज सोनवणे,पर्यवेक्षक राजेश तुंबारे,कृषि पर्यवेक्षक,कृषि सहाय्यक व शेतकरी गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी कोपरगाव तालुक्यातील शेतकरी गटांना गळीत धान्य अभियान अंतर्गत ४३ शेतकरी गटांची सोयाबीन प्रकल्पासाठी निवड करण्यात येवून या गटांना २३६.५० क्विंटल सोयाबीन बियाणे,तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत बाजरीसाठी ६ शेतकरी गटांना २.४० क्विंटल, मका ४ शेतकरी गटाला ६.०० क्विंटल, तूर एका शेतकरी गटाला ३.५ क्विंटल बियाणांचे,मका अधिक सोयाबीन २ गटांना ७ क्विंटल असे एकूण जवळपास २५० क्विंटल बियाणे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले आहे.

या प्रसंगी बोलतांना उपसभापती अर्जुन काळे म्हणाले की,”मागील वर्षी या अभियानाअंतर्गत १०५.०० क्विंटल बियाणांचे वाटप करण्यात आले होते.यावर्षी त्यामध्ये वाढ होवून २३६.५० क्विंटल सोयाबीन बियाणाचे वाटप करण्यात आले.सोयाबीनला चालू वर्षी उच्चांकी दर मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहे.यावर्षी जास्तीत सोयाबीनचे उत्पन्न घेण्याचा शेतकऱ्यांचा कल आहे.आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीणचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी निश्चितपणे कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.खाजगी कृषी सेवा केंद्रांकडे देखील बियांण्यांचा साठा उपलब्ध असल्यामुळे बियाणे टंचाई जाणवण्याची शक्यता नाही.परंतु शेतकऱ्यांनी आपल्या कडील घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी घेऊन व बिज प्रक्रिया करुन पेरणी करीता वापरावे म्हणजे त्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल.या २५० क्विंटल बियाणांबरोबरच ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून ज्या शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे मागणी नोंदविली होती त्यांची लकी ड्रॉ पद्धतीने निवड झाली असल्याचे शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close