कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्याचा विकास अखंड सुरू ठेणार-आ.काळे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या प्रतिकूल कालखंडात मतदार संघाच्या विकासावर विपरीत परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत असली तरी मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून महाविकास आघाडी सरकारच्या सर्वच विभागाकडून मिळालेल्या सहकार्यातून मतदार संघाचा विकास प्रगतीपथावर आहे. यापुढे कोरोनाशी लढा देतांना मतदार संघाचा विकास आपण थांबू देणार नसल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आ. काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत २० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या रेलवाडी मारुती मंदिर ते पोपट लोंढे वस्ती रस्ता व महेश लोंढे शेड ते जंगली महाराज इंटरनॅशनल स्कुल रस्ता खडीकरण तसेच सडे येथे पुणतांबा रोड ते वाकचौरे वस्ती रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन व जनसुविधा योजनेतून बांधण्यात आलेल्या सडे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकापर्ण नुकतेच त्यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,कोकमठाणच्या सरपंच उषाताई दुशिंग,उपसरपंच दीपक रोहोम,जिनिंग व प्रेसिंगचे संचालक सुदाम लोंढे,सडेचे सरपंच अजित कोताडे,उपसरपंच सुनील बारहाते,विजय रक्ताटे,विजय थोरात, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,अभियंता उत्तम पवार,रावसाहेब शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव मतदार संघ हे माझे कुटुंब आहे. आज कुटुंबापुढे कोरोनाचे संकट आहे अशा परिस्थितीत माझ्या कुटुंबाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरणे हि माझी जबाबदारी आहे. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी योग्य त्या उपाय योजना करून त्याचा परिणाम विकास कामांवर होऊ न देता आजपर्यंत मतदार संघाचा विकास थांबू दिला नाही व यापुढेही थांबणार नाही.
यावेळी शिवस्वराज्य दिनानिमित्त आ.काळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वराज्यगुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.