कोपरगाव तालुका
वारीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ग्रामपंचायत कार्यालयासमोर शासनाच्या आदेशानुसार व मार्गदर्शक सुचना पाळत आकर्षक गुढी व भगवी पताका उभारून सुंदर रांगोळी सजावट करत ३४८ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
शिवरायांचा राज्याभिषेक ०६ जून १६७४ दिवशी झाला.त्यामुळे दरवर्षी ०६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो या वर्षी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना हा दिन साजरा करण्याचे आदेश दिले होते.
स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ०६ जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.शिवरायांचा राज्याभिषेक ०६ जून १६७४ दिवशी झाला.त्यामुळे दरवर्षी ०६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो.दरवर्षी शिवराज्याभिषेक महोत्सव समिती महाराजांना मानचा मुजरा देण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.या वर्षी या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक खास गोष्ट संपन्न झाली असून राज्य सरकारनेच “शिवराज्याभिषेक दिन”साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.व त्या प्रमाणेआदेश जारी केले होते.त्या आदेशाप्रमाणे आज हा सोहळा आता ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला आहे.त्याला कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत अपवाद नाही.त्यांनी मोठ्या उत्साहात या उत्सवाचे आयोजन केले होते.
यावेळी ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या प्रतिमेचे व गुढीचे पूजन प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिश कानडे यांचे सह उपस्थित उपसरपंच विशाल गोर्डे,सदस्य गोकुळ कानडे,प्रशांत संत,राहुल शिंदे,प्रकाश गोर्डे,माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे,मधुकर टेके,अशोक निळे,गजानन देशमुख ,सोमनाथ थोरात आदींनी पुजन करुन राष्ट्रगीत घेऊन मानवंदना दिली यावेळी ईश्वरी कानडे या चिमुकलीने शिवराय साकारून सर्वांचे लक्ष वेधले यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ,सतिष गायकवाड,संदीप आगे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.