कोपरगाव तालुका
बायकोबरोबर बोलल्याच्या कारणावरून लोखंडी गजाने मारहाण,कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
फिर्यादी हा आरोपीचे घरासमोरून जात असताना त्यावेळी आरोपीने संदीप दशराथ शिंदे याने त्यांना थांब म्हणाले की,”तू माझ्या बायको सोबत का बोलला ? या संशयावरून त्यांनी त्याचे हातातील लोखंडी गजाने मारहाण करून दुखापत केली आहे.यातील साक्षीदार हे मध्ये सोडण्यात आले असता त्यांनाहीं मारहाण केली म्हणून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी साईनाथ गंगाधर निकम (वय-३५) याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने बोलकी परिसरात खळबळ उडाली आहे.
बोलकी येथील फिर्यादी हा काही कारणाने आरोपी संदीप शिंदे यांचे पत्नीशी बोलत असताना आरोपी संदीप शिंदे याने ते पाहिले व त्यास त्याचा संशय व राग आला त्याने याबाबत डूख धरून त्याला दि.२५ मे रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान बोलकी येथे गाठले व त्याला तीन मी.मी.लोखंडी गजाने बेदम मारहाण केली आहे.त्यात फिर्यादी हा जखमी झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी साईनाथ निकम हा व आरोपी संदीप दशरथ शिंदे व दुसरा आरोपी बाबासाहेब दशराथ शिंदे हे एकाच गावातील रहिवाशी असून ते एकमेकांचे परिचित आहेत.फिर्यादी हा काही कारणाने आरोपी संदीप शिंदे यांचे पत्नीशी बोलत असताना आरोपी संदीप शिंदे याने ते पाहिले व त्यास त्याचा संशय व राग आला त्याने याबाबत डूख धरून त्याला दि.२५ मे रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान बोलकी येथे गाठले व त्याला तीन मी.मी.लोखंडी गजाने बेदम मारहाण केली आहे.त्यात फिर्यादी हा जखमी झाला आहे.तसेच साक्षिदार हे भांडण सोडण्यास मध्ये गेला असता त्यांनी त्यासही मारहाण केली आहे.या बाबत आरोपीला या मारहाण करण्यास त्याचा भाऊ बाबासाहेब शिंदे याने सहाय्य केले आहे.या प्रकरणी फिर्यादी साईनाथ निकम याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या बाबत बोलकी परिसरात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.१८१/२०१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री वाखुरे हे करीत आहेत.