कोपरगाव तालुका
राहाता-कोपरगावात वादळाने मोठे नुकसान
न्यूजसेवा
वाकडी-(वार्ताहर)
दरम्यान कोपरगाव तालुक्यातही दुपारी आलेल्या वादळी पावसाने कहर केला असून कोपरगाव मधील हनुमाननगर सह ग्रामीण भागातील जेऊर पाटोदासहअनेक गावात या वादळाचा फटका बसला आहे.सुदैवाने कोणतीही जीवित हानी मात्र झाली नाही.
गारासह आलेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले.काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली वाकडी चितळी रस्त्यावर बाभूळ झाड आडवे पडल्याने या भागातील वाहतूक बंद होती.याच वेळी ज्ञानेश्वर वाघ यांच्या वीट मातीच्या घराचे छप्पर उडून गेले घरातील संसारोपयोगी साहित्य अस्ताव्यस्त झाले त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आता राहण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याने वाघ यांचे कुटुंब हताश झाले आहे.वाघ यांचा वाकडी गावात छोटासा व्यवसाय आहे मात्र सध्याच्या लॉकडाऊन मुळे व्यवसाय ठप्प आहे.त्यामुळे अस्या परिस्थितीमध्ये वाघ यांना संसार पुन्हा उभा करण्यासाठी शासकीय मदतीची गरज आहे.