जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राहाता-कोपरगावात वादळाने मोठे नुकसान

न्यूजसेवा

वाकडी-(वार्ताहर)

बंगालच्या उपसागरात “यास” नावाचे वादळ उठण्याची हवामान खात्याने वर्तवली असतानाच आज सोमवार दि 24 मे रोजी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने राहाता तालुक्यातील वाकडी परिसरात काही ठिकाणी शेती व घराचे मोठे नुकसान झाले आहे.या वादळी पावसाने वाकडी चितळी रस्त्यावर असलेल्या चिंचमळा परिसरात राहत असलेले शेतकरी ज्ञानेश्वर काशिनाथ वाघ यांच्या संपूर्ण घराचे छप्पर पूर्णपणे उडून गेल्याने वाघ यांचा संसार उघड्यावर पडून मोठे नुकसान झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यातही दुपारी आलेल्या वादळी पावसाने कहर केला असून कोपरगाव मधील हनुमाननगर सह ग्रामीण भागातील जेऊर पाटोदासहअनेक गावात या वादळाचा फटका बसला आहे.सुदैवाने कोणतीही जीवित हानी मात्र झाली नाही.

गारासह आलेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले.काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली वाकडी चितळी रस्त्यावर बाभूळ झाड आडवे पडल्याने या भागातील वाहतूक बंद होती.याच वेळी ज्ञानेश्वर वाघ यांच्या वीट मातीच्या घराचे छप्पर उडून गेले घरातील संसारोपयोगी साहित्य अस्ताव्यस्त झाले त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आता राहण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याने वाघ यांचे कुटुंब हताश झाले आहे.वाघ यांचा वाकडी गावात छोटासा व्यवसाय आहे मात्र सध्याच्या लॉकडाऊन मुळे व्यवसाय ठप्प आहे.त्यामुळे अस्या परिस्थितीमध्ये वाघ यांना संसार पुन्हा उभा करण्यासाठी शासकीय मदतीची गरज आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यातही दुपारी आलेल्या वादळी पावसाने कहर केला असून कोपरगाव मधील हनुमाननगर सह ग्रामीण भागातील जेऊर पाटोदासहअनेक गावात या वादळाचा फटका बसला आहे.सुदैवाने कोणतीही जीवित हानी मात्र झाली नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close