कोपरगाव तालुका
कोपरगावात रस्त्याचा निधीच पळविण्याचा सांगवी भुसारमध्ये डाव,शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव ( प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन फेब्रुवारी रोजी प्रजिमा-4 ते सांगवी भुसार (ग्रामीण मार्ग -64) या सव्वातीन कि.मी.मार्गासाठी मंजूर करण्यात आलेला 2 कोटी 54 लाख 66 हजारांचा निधी हा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या हद्दीतील रस्त्याकडे वळविण्याचा डाव आखला असून त्याला स्थानिक शेतकऱ्यांनी कडवा विरोध केला असून या बाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचेकडे तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.
सांगवी भुसार येथील ग्रामस्थांनी सरकारकडे पाठपुरावा करून दोन कोटी 54 लाख 66 हजार रुपयांचा निधी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मोठ्या प्रयत्नाने 2 फेब्रुवारी 2019 रोजी मंजूर केला होता.या रस्त्या बरोबरच जिल्ह्यात सोळा व त्यात कोपरगाव तालुक्यातील या रस्त्या सोबतच अन्य तीन रस्ते मंजूर करण्यात आले असून या रस्त्याला सर्वात जास्त निधी मंजूर झाला आहे.हा रस्ता विकास आराखड्यात मंजूर हि आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, सांगवी भुसार या ग्रामपंचायत हद्दीत प्रमुख जिल्हा मार्ग ते सांगवी भुसार हा रस्ता स्थानिक शेतकऱ्यांना व नजीकच्या गावांना वाहतुकीसाठी अहंम मानला जातो.त्यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करून दोन कोटी 54 लाख 66 हजार रुपयांचा निधी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मोठ्या प्रयत्नाने 2 फेब्रुवारी 2019 रोजी मंजूर केला होता.या रस्त्या बरोबरच जिल्ह्यात सोळा व त्यात कोपरगाव तालुक्यातील या रस्त्या सोबतच अन्य तीन रस्ते मंजूर करण्यात आले असून या रस्त्याला सर्वात जास्त निधी मंजूर झाला आहे.हा रस्ता विकास आराखड्यात मंजूर हि आहे.तथापि हि बाब स्थानिक कोपरगाव तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्या लक्षात आल्यावर यांच्या मनात या रस्त्या बाबत असूया निर्माण झाली व त्यांनी या रस्त्याचा निधी नजीकच असलेल्या ग्रामीण मार्ग दहासाठी पळविण्याचा डाव आखला त्यासाठी नगर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरले.
सदरचा रास्ता तक्रारदारांचा नाही म्हटल्यावर शेतकऱ्यांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे या बाबत तक्रार केली.त्यांनी याबाबत चौकशी अधिकारी नेमले व त्याबाबत अहवाल मागितला त्या तेरा जूनच्या अहवालात सदरचा रस्ता तोच असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे शेतकरी संतापले असून आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
व त्यानां या शेतकऱ्यांना हा रस्ता तुमचा नाहीच अशी बतावणी केली.मात्र शेतकरी व ग्रामस्थ चाणाक्ष निघाले त्यांनी माहिती अधिकारात या रस्त्याचे कागदपत्र मागवले व त्याची खात्री केली असता सदरचा मंजूर रस्ता हाच असल्याचे निष्पन्न झाले तरी हि राजकीय मंडळी कोणाचे ऐकेच ना ! अखेर या बाबत शेतकऱ्यांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे या बाबत तक्रार केली.त्यांनी याबाबत चौकशी अधिकारी नेमले व त्याबाबत अहवाल मागितला त्या तेरा जूनच्या अहवालात सदरचा रस्ता तोच असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे शेतकरी संतापले असून त्यांनी या बाबत 19 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर.तहसीलदार कोपरगाव,पोलीस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे यांचेकडे लेखी तक्रार केली आहे.व आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.निवेदनावर रावसाहेब जाधव,माणिक शिंदे, जीवन जाधव, देवराम वाबळे,मोहन कासार,काशिराम हांडे,शिवाजी जाधव,बाबासाहेब जाधव,सतीश शिंदे आदींसह सत्तावीस शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.आता जिल्हा परिषदेचे अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेतात या कडे सांगवी भुसार येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.