जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेचा शहर प्लॅस्टिक मुक्त करण्याचा संकल्प -मुख्याधिकारी सरोदे

जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव( प्रतिनिधी )

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती कोपरगाव नगरपरिषदेने मोठ्या उत्साहात साजरी केली असून त्या निमित्त प्लॅस्टिक मुक्त शहराची संकल्पना साकारण्यासाठी कोपरगांव नगर परिषदेच्या वतीने शहराच्या मुख्य रस्त्याने प्लॅस्टिक मुक्त शहर संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त पंतप्रधान यानीं स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सिंगल युज प्लास्टिक चा वापर बंद करण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने हे ध्येय साध्य करण्यासाठी ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०१९ याकालावधीत स्वच्छता हि सेवा हि मोहीम राबविण्यात येत आहे-सरोदे

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त पंतप्रधान यानीं स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सिंगल युज प्लास्टिक चा वापर बंद करण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने हे ध्येय साध्य करण्यासाठी ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०१९ याकालावधीत स्वच्छता हि सेवा हि मोहीम राबविण्यात येत आहे.त्यानुसार कोपरगाव नगर परिषदेने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये शहरातील शाळा,महाविध्यालयातील विध्यार्थी, शिक्षक वृंद तसेच महिला बचत गटातील महिला,नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी, इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी व शहरातील समाजसेवी संघटना यांनी प्लॅस्टिक मुक्त शहर संकल्प महारॅलीत उस्पुर्त सहभाग घेतला.दरम्यान महारॅली पूर्वी भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्लॅस्टिक मुक्ती प्रतिज्ञा ग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

तदनंतर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकार करण्यासाठी श्रमदान चळवळ राबवून सिंगल युज प्लास्टिक संकलित करण्यात आले तसेच शहरातील नागरिकांनाही त्यांचे कडील प्लास्टिक नगर परिषदे कडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या करिता नगर परिषदेच्या प्लास्टिक संकलन केंद्राजवळ नागरिकांना प्लास्टिक जमा करण्याचे प्रोत्साहन मिळणे कामी नागरिकांसाठी एक सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close