सामाजिक उपक्रम
नोकरी भरती मेळावा तरुणांसाठी गरजेचा – मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यातील छोट्या उद्योगांना वाव देण्यासाठी बिझनेस एक्सपो भरवला जातो तद्वतच कोपरगाव शहर व तालुक्यात उच्च शिक्षित बेरोजगार तरुण व तरुणीं आहेत त्यांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकर भरती मेळावा कोपरगाव शहरात होणे गरजेचा असल्याची मागणी कोपरगाव नगपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.

“कोपरगाव तालुक्यातील जे भूमिपुत्र बाहेरगावी शिकून गेले मात्र त्यांनी स्वतःच्या कंपन्या स्थापित केल्या आहेत.किंवा मोठ्या कंपन्यांत मोठया पदावर कार्यरत आहेत.त्याच्याशीही संपर्क साधून तालुक्यातील इतर तरुणांना कसं रोजगार देता येईल नोकरीला लावता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे”- मंगेश पाटील,अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले कोरोनामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांच्या नोकऱ्या व रोजगार गेले आहेत.विविध कंपन्यांनी उत्पादनात कपात झाल्यामुळे कर्मचारी वर्ग कमी तरी केला किंवा त्यांना काही दिवसांच्या सुट्टीवर पाठवले होते.याशिवाय नवीन उच्च शिक्षित तरुणाची दर वर्षी नव्याने भर पडत आहे.त्या तुलनेत मात्र भरती होताना दिसत नाही त्यामुळे या पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असताना कोपरगाव शहरात याचा अभाव दिसत आहे.त्यासाठी रोजगार मेळावे होणे ही काळाची गरज बनली आहे.मात्र या साठी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी वाचा फोडली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे की,”प्राथमिक स्वरूपात आपल्या जवळच असलेल्या संभाजीनगर,अहिल्यानगर (नगर),नासिक,पुणे या भागातील कंपन्यांशी संपर्क साधून व कोपरगाव तालुक्यातील बाहेरगावी शिकून गेले मात्र त्यांनी स्वतःच्या कंपन्या स्थापित केल्या आहेत.किंवा मोठ्या कंपन्यांत मोठया पदावर कार्यरत आहेत.त्याच्याशीही संपर्क साधून तालुक्यातील इतर तरुणांना कसं रोजगार देता येईल नोकरीला लावता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.दहावी,बारावी,बी.कॉम.बी.ए., बी.एससी.,तत्संम पदवीधर अन्य क्षेत्रातील अभियंता,नर्सिंग,बी.बी.ए. एम.बी.ए.,छोटे कोर्सेस असे वेगवेगळे शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तालुक्यातील युवकांसाठी व युवतींसाठी सर्वांनी जर एकत्र येऊन निस्वार्थीपणे आपल्या तालुक्यातील युवकांसाठी रोजगार मिळण्यासाठी जर प्रयत्न केले तर निश्चितपणे या युवकांना व त्यांच्या कुटुंबांना या माध्यमातून मोठा हातभार लागेल व एक मोठा आदर्श या युवकांपुढे आपल्या गावातील पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी उभा राहील.
दरम्यान भविष्यात कोपरगाव व शिर्डी मध्ये सावळीवीहीर मध्ये मोठी औद्योगिक वसाहत घोषित झाली आहे व समृद्धी महामार्गानजीक कोपरगाव तालुक्यात’स्मार्ट सिटी’ चे नियोजन सरकारचे आहे.यामध्ये मोठ मोठ्या कंपन्या येणार आहेत सुरू होणार आहेत असे कळते.याचे काम होईपर्यंत दोन-तीन वर्षात हे युवक अनुभव घेऊन पुन्हा आपल्या तालुक्यातील असणाऱ्या कंपन्यामध्ये जास्त पगारावर येऊ शकतात व आपल्याच तालुक्यात राहून त्यांचा खर्चही कमी होऊ शकतो व रिटायर्ड सिटी हे नाव पुसले जाण्यासाठी हे युवक आपल्या कुटुंबासोबत येऊन राहू शकतात.असा दुहेरी फायदा या तरुणांना व त्यांच्या कुटुंबाला होईल.भविष्यात शिर्डी किंवा कोपरगाव ही जिल्हा किंवा जिल्ह्याचे मुख्यालय होणार असणारे निश्चितपणे इथे व्यापार चांगला वाढणार आहे.यासाठी तरुण आणि राजकीय नेते आत्ताच जर एकत्र आले तर याची फळे भविष्यात नक्कीच आगामी पिढीला मिळतील असा आशावाद मंगेश पाटील यांनी शेवटी व्यक्त केला आहे.