जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरासाठी मोठा निधी मंजूर-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जीवघेण्या कोरोना महामारीच्या संकटात कोपरगाव विधानसभा मतदार संघात मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करतांना कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी केलेला पाठपुराव्याला यश मिळाले असून कोपरगाव शहराच्या विकासासाठी तब्बल ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

“कोपरगाव शहरातील नागरिकांची मागणी असलेल्या विविध कामांसाठी निधी मिळावा यासाठी नगरविकास खात्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला नगरविकास खात्याने मंजुरीची मोहोर उमटवून या विकासकामांसाठी तब्बल ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे”-आ.आशुतोष काळे

कोपरगाव शहरातील नागरिकांची मागणी असलेल्या विविध कामांसाठी निधी मिळावा यासाठी नगरविकास खात्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला नगरविकास खात्याने मंजुरीची मोहोर उमटवून या विकासकामांसाठी तब्बल ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यामध्ये धारणगाव रोड विकसित करणे २ कोटी,प्रशासकीय इमारती समोरील बगीचा सुधारणा करणे १ कोटी, प्रशासकीय इमारत कंपाऊंड करणे ५० लक्ष, कोपरगाव शहरातील (बाजारतळ) स्मशानभूमी विकसित करणे १ कोटी, कोपरगाव शहरातील (मोहनीराजनगर) स्मशानभूमी विकसित करणे ५० लक्ष असा एकूण ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विकासकामांची दखल घेवून आ.काळे यांनी पाठपुरावा करून कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.कोपरगाव शहराच्या विकासाचे अनेक प्रस्ताव शासनदरबारी दाखल केले आहेत.कोरोना संकटाच्या काळातही निधी मिळाला आहे. यापुढे देखील कोपरगाव शहराच्या विकासासाठी अजूनही निधी मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आ. काळे यांनी सांगितले असून कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना.अजीत पवार,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचे विशेष आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close