जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कर्मवीरांनी मानवीय संवेदनेचा अंगीकार केला-डॉ.सदानंद भोसले

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,शाहू महाराज,महात्मा गांधी,डॉ. आंबेडकर यांच्या वैचारिक प्रभावातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अहोरात्र संघर्ष करून गोरगरीबांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना १९१९ रोजी करून समाजापुढे आदर्श स्थापित करण्याची संवेदना कर्मवीरांच्या अंगी होती असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.सदानंद भोसले यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव येथे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३२ वा जयंती कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन भगिरथ शिंदे हे होते.
सदर प्रसंगी माजी मंत्री व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, लताताई शिंदे सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पाचही शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

रयत’ हे नाव कर्मवीरांनी छत्रपती शिवाजी महाराज,रविंद्रनाथ टागोर यांच्या ‘जन’ या संकल्पनेतून स्वीकारून त्यांनी दीन-दलित, बहुजनांना ज्ञानाच्या वाटा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याची जाणीव डॉ.भोसले यांनी यावेळी करून दिली.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘रयत’ हे नाव कर्मवीरांनी छत्रपती शिवाजी महाराज,रविंद्रनाथ टागोर यांच्या ‘जन’ या संकल्पनेतून स्वीकारून त्यांनी दीन-दलित, बहुजनांना ज्ञानाच्या वाटा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याची जाणीव यावेळी करून दिली.

अध्यक्षीय भाषणात अॅड.भगिरथ शिंदे यांनी आजही रयत सेवक वृंद कर्मवीरांच्या प्रेरणेतून अथक मेहनत घेवून समाज घडविण्याचे कार्य अहोरात्र करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.त्यात विशेष सत्कार प्रा. गणेश विधाटे व डॉ. बाबासाहेब शेंडगे यांचा करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य दिलीप दारुणकर,सुनील गंगुले, संदीप वर्पे,,पाचही शाखांचे शाखाप्रमुख श्री खैरनार, सुभाष दरेकर.सौ.सुरवसे, श्री काकळीज, प्राचार्य डॉ. थोपटे, महाविद्यालयातील तिन्ही शाखांचे उपप्राचार्य डॉ. आर.जी.पवार, प्रा. रमेश झरेकर, डॉ. विजय निकम तसेच प्रा. डी.डी.सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.आर. थोपटे यांनी तर सुत्रसंचलन प्रा.प्रकाश सावंत यांनी केले. व पाहुण्यांचा परिचय एम.एस सुरवसे यांनी करून दिला. मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक व्ही.व्ही.काकळीज यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close