जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव निवडणूक कार्यालयात आता सेल्फी पॉईंट!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव (प्रतिनिधी )

देशात व राज्यात लोकशाहीची वाढत असलेली विटंबना थांबविण्यासाठी खरे तर या पूर्वीच प्रयत्न व्हावयास हवे होते मात्र निवडणूक आयोगाने व जागरूक नागरिकांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून लोकशाहीला थेट बाजारात उभे केले होते व तिचा हजार-पाचशेत खुलेआम बाजार होत असताना सर्वच उघड्या डोळ्याने पाहत होते मात्र आता निवडणूक आयोगाला जाग आली असून लोकशाहीकडे आता नवीन मतदारांनी तिचे पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न करायला प्रारंभ केला असून त्याची सुरुवात कोपरगावात आज सकाळी पाहायला मिळाली असून निवडणूक अधिकाऱ्यांनी चक्क निवडणूक कार्यालयात मतदारांना सेल्फी पॉईंट विकसित केला असून त्यात आता नवमतदारांसह कोणीही आपला फोटो काढून लोकशाही प्रति आपली संवेदना प्रकट करू शकतो व सदरचा फोटो सामाजिक संकेतस्थळावर पाठवू शकतो.निवडणूक आयोगाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

देशात व राज्यात लोकशाहीची वाढत असलेली विटंबना थांबविण्यासाठी खरे तर या पूर्वीच प्रयत्न व्हावयास हवे होते मात्र निवडणूक आयोगाने व जागरूक नागरिकांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून लोकशाहीला थेट बाजारात उभे केले होते व तिचा हजार-पाचशेत खुलेआम बाजार होत असताना सर्वच उघड्या डोळ्याने पाहत होते मात्र आता निवडणूक आयोगाला जाग आली असून लोकशाहीकडे आता नवीन मतदारांनी तिचे पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न करायला प्रारंभ केला असून त्याची सुरुवात कोपरगावात आज सकाळी पाहायला मिळाली असून निवडणूक अधिकाऱ्यांनी चक्क निवडणूक कार्यालयात मतदारांना सेल्फी पॉईंट विकसित केला असून त्यात आता नवमतदारांसह कोणीही आपला फोटो काढून लोकशाही प्रति आपली संवेदना प्रकट करू शकतो.

राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी येत्या 21ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे.कोपरगांव विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तहसिल कार्यालय कोपरगांव येथे मतदारांना जागृती आणि आकर्षित करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी राहूल मुंडके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांचे संकल्पनेतून
सेल्फी पाँईट उभारले आहे.दोन प्रकारच्या कलाकृती उभारण्यात यात पारंपरिक आकाश कंदिलाच्या प्रतिकृती आणि शालेय शिक्षण फलक यामध्ये वर्तुळाकार छेद देण्यात आला आहे. यामागे उभे राहुन सेल्फी घेता येणार आहे.यावर, “रंग उत्सवाचे…पवित्र लोकशाहीचे…”तसेच, “वाढवू या लोकशाहीची शान…करु या शंभर टक्के मतदान “अशी घोषवाक्य लिहिण्यात आली असून मतदान दिनांक आणि वेळ लिहिण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी पहिला सेल्फी काढून सेल्फी पाँईंटचे लोकार्पण केले आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार योगेश चंद्रे याप्रसंगी उपस्थित होते.सदर सेल्फी पाईंट मतदारांना खुला राहणार आहे.तसेच जवळच मिडिया सेंटर भेट देवून मतदानाची प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रक्रिया समजण्यासाठी वोटींग मशिन,व्हीव्हीपँट मशिन ठेवण्यात आले आहे.प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची चाचपणी आणि पारदर्शक पडताळणी हा अनुभव मतदारांना घेण्यात येणार आहे.तरी मतदारांनी सेल्फी पाँईंटला भेट देवून आपापला सेल्फी व्हॉट्सअप,ट्विटर,फेसबुक आदि सामाजिक संकेतस्थळावर पाठवावा असे आवाहन सर्व मतदारांना
कोपरगाव निवडणूक शाखेच्या वतीने सहाय्यक निवडणूक अधिकारी योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधींसोबत बोलताना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close