कोपरगाव तालुका
आधुनिक तंत्रज्ञानामुळे गोदावरी खोरे दूध संघाचा राज्यात लौकीक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सद्याचा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानावर निर्भर असल्याने दिवसागणिक येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला तरच व्यवसायात प्रगती करता येईल असे मत खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले आहे.
आधुनिकतेला प्राधान्य दिल्याने गोदावरी दूध संघाने राज्यात लौकीक प्राप्त केला असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.भारत सरकारच्या पशुपालन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या राष्ट्रीय दुग्धविकास योजना २०२० -२०२१ अंतर्गत व महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मुंबई यांच्या माध्यमातून गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघास प्राप्त झालेल्या मिल्को स्कॅन एफ.टी.-१ या यंत्रसामुग्रीचे उदघाटन तसेच संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे यांच्या नुतनीकरण केलेल्या स्तृतिस्थळाचे उदघाटन खा.डॉ.सुजय विखे पाटील,खा.सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्याप्रसंगी खा.लोखंडे यांनी मत व्यक्त केले.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे यांनी संघाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करताना नामदेवराव परजणे यांच्या प्रेरणेतून संघाच्या कार्यक्षेत्रात धवलक्रांतीचा उदय झालेला आहे.आधुनिकतेची कास धरुन संघाने प्रगतीचा आलेख उंचावत नेलेला आहे.कार्यक्षेत्रातील हजारो कुटुंबांना या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक हातभार लागलेला आहे.शेतीला पुरक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यवसायाने सर्वसामान्य, गोरगरीब शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग सापडला आहे.संघात नव्याने कार्यरत झालेल्या मिल्को स्कॅन एफ.टी.-१ या अत्याधुनिक मशिनरीमुळे दुधातील
स्निग्धांश,स्निग्धांशतेतर घटक,प्रोटीन,लॅक्टोज,ग्लुकोज,केसिन,डेनसिटी,लॅक्टीक,अॅसिड,युरिया,सायदीक अॅसिड,फ्रिजिंग पॉईंट,सेल्सियस,अॅसेडिटी आदींच्या तपासण्या करण्यास मदत होणार असल्याने कामकाजात यामुळे गती येणार आहे. शिवाय एका मिनीटातच रिझल्ट देण्याची क्षमता देखील या यंत्रामध्ये आहे अशी माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी दिली. भविष्यात दिवसागणिक होऊ घातलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर स्पर्धा करण्यासाठी गोदावरी दूध संघ सज्ज असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात सहभागी करुन घेताना पशुधनाच्या आरोग्याचाही संघाने वेळोवळी विचार करुन त्यादृष्टीने कामकाज सुरु केलेले असल्याचेही परजणे यांनी सांगितले.
प्रारंभी संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत केले.यावेळी संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमास अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करुन कार्यक्रम पार पडला आहे.