जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाची स्थापना

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव शहरांतील निवारा व परिसरातील उपनगरे येथील नागरिकांसाठी समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या पुढाकारातून श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाची नुकतीच स्थापना करण्यात अली आहे याबद्दल जेष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आधुनिक काळात लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असली तरी जेष्ठ नागरिक एकाकी जीवन जगण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.माणसें एकलकोंडी बनत चालली आहेत.त्याना आधार देणाऱ्यां माणसांची कमतरता पडत चालली आहे.त्यासाठी सामाजीक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे.नेमकी तीच गरज ओळखून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळ स्थापन करण्याचा उपक्रम सुरु केला असून त्याचे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

आधुनिक काळात लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असली तरी जेष्ठ नागरिक एकाकी जीवन जगण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.माणसें एकलकोंडी बनत चालली आहेत.त्याना आधार देणाऱ्यां माणसांची कमतरता पडत चालली आहे.त्यासाठी सामाजीक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा सुहासिनी कोयटे,विवेक कोल्हे,राजेश परजणे,चांगदेव शिरोडे,मोहनलाल झंवर,सुमन झंवर,तुषार बाग्रेचा,गुलाबाचंद अग्रवाल,इम्रान सय्यद,जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष छोटूभाई जोबंनपुत्रा, राजश्री शाहूमहाराज जेष्ठ नागरिक विचारमंचचे अध्यक्ष मन्साराम पाटील, समता पतसंस्थेचे संचालक गुलाबचंद अग्रवाल, राजकुमार बंब,चांगदेव शिरोडे,अरविंद पटेल, जितेंद्र शहा,आनंद पाटील,आदित्य महाजन,पुष्पलता सुतार,नगरसेवक जनार्दन कदम,दीप गिरमे आदींसह शहरातील सर्व जेष्ठ, श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते.
सदर प्रसंगी डॉ.मंगेश कोरडे यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना आरोग्या बाबत मार्गदर्शन केले.
समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल व निर्मला अग्रवाल यांच्या हस्ते निवारा परिसरातच श्रेष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करण्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यांचे सुपुत्र दिपक अग्रवाल यांनी पिताश्रींच्या वाढदिवसानिमित्त ७१,००० रुपयांच्या व्हिलचेअर, वॉकर, मॉडयुलर बेड, कमोड सेट आदि साहित्य देणगी म्हणून दिले तर पी.एस खान यांनी रोख स्वरुपात ५००० रुपयांची देणगी दिली आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्योती सानप यांनी केले तर उपस्थितांचे आभार समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close