जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कुंभारी येथे पत्रकारास धमकी,कोपरगाव पोलिसात तक्रार दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील पत्रकार गहिनीनाथ घुले यांनी त्या भागातील रस्त्याची दुरवस्थेबाबत,”कुंभारी रस्त्यांचे वाजले तीनतेरा” या आशयाची बातमी छापल्याचा राग मनात धरून सामाजिक संकेत स्थळावरून त्याच गावातील इसम भागवत रायभान कदम याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने कोपरगाव तालुक्यातील पत्रकारांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या बाबत निवेदन देऊन या इसमाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कुंभारी येथील पत्रकार गहिनीनाथ त्रिंबक घुले हे एका वृत्तपत्राचे त्याच गावातून काम पाहतात.त्यांनी सतरा सप्टेंबरच्या अंकात कुंभारीतील रस्त्यांचे वाजले तीनतेरा अशा आशयाची बातमी छापली याचा राग मनात धरून भागवत कदम याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोपरगाव शाखेच्या वतीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकतेच निवेदन देऊन आरोपीची चौकशी करून त्या विरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.

सदर प्रसंगी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नानासाहेब जवरे,पत्रकार योगेश डोखे,युसूफ रंगरेज,संजय लाड,दत्तात्रय गोर्डे,विनोद जवरे,रमेश भोंगळ,गहिनींनाथ घुले आदींसह बहुसंख्य पत्रकार हजर होते.तालुका पोलीस ठाण्यात श्री आंधळे यांनी निवेदन स्वीकारले.निवेदनाच्या प्रति जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू,विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे आदींना दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close