जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात लोकप्रतिनिधींच्या अर्धवट कामांच्या उदघाटनांचा सपाटा,मात्र सिंचनाच्या पाण्यावाचून शेतकरी वंचित

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

विधान सभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास काही तासांचा अवधी राहिला असताना कोपरगाव तालुक्यात विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी अर्धवट कामांच्या उदघाटनांचा सपाटा लावला असून पाच वर्षात कुठेच विकास दिसत नसताना तालुक्यात काहीं हजारातील बस थांब्याचे वाऱ्याने कधीही उडून जाऊ शकतात असे शेड उभे करण्याची कामे वर्तमानात युद्धपातळीवर सुरु असल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

देशातील चार राज्यांच्या निवडणुका जाहीर होणार आहे त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे.त्यामुळे जे सत्तेत आहे त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची घाई झाली आहे तर जे सत्तेच्या तळ्याच्या बाहेर आहे त्यांची तळ्यात उडी मारण्यासाठी धडपड सुरु आहे.कोपरगावात गत विधानसभा निवडणुकीत दहा वर्षाने पुन्हा एकदा कोल्हे कुटुंबियांच्या ताब्यात जनतेने सत्तेची सूत्रे सोपवली.त्याला आज पाच वर्ष उलटत आली आहे.या पाच वर्षाच्या काळात मागे वळून पहिले तर आपल्याला काय दिसते तर शेती सिंचनाचा प्रश्न जैसे थेच दिसत आहे.कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जागेवरच ठेवण्यात या मंडळींनी यश मिळवले आहे.पाच क्रमांकाच्या साठवण तलावाच्या प्रश्नाला बागल देऊन निळवंडेच्या न येणाऱ्या पाण्याचे गाजर शहरी जनतेला दाखवून झुलवत ठेवले आहे.सरकारने साठवण तलावाला दोन कोटींचा निधी देऊनही तो परत पाठविण्यास हातभार लावला आहे.समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने नगरपालिकेच्या साठवण तलावातील माती मोफत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर कबुल करूनही त्या कामाला कोलदांडा घातला गेला आहे.पश्चिमेच्या पाणी पूर्वेला वळविण्याचे आश्वासन निळवंडे धरणासारखे तीन पिढ्यांपासून प्रत्येक निवडणुकीला दिले जात आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कामा बाबत नगरच्या नेत्यांची चांगलीच टर एका कार्यक्रमात उडवली होती व येथील नेते एखादा प्रश्नाचे भांडवल करून सहज विसतीस वर्ष वेळ मारून नेतात असा थेट हल्लाबोल केल्याचा घरचा आहेर अनेकांच्या लक्षात असेल.तो कोपरगाव तालुक्याला तंतोतंत लागू होत आहे.यांच्या वैयक्तिक संस्थांचे काम वीस ते पन्नास वर्ष खोळंबलेले कोणालाही आढळणार नाही.मात्र सामाजिक काम आले कि यांच्या खोल पोटात दुखण्यास आरंभ होतो व तो आजार थांबण्याचे नाव घेत नाही.असे बरीच उदाहरणे सांगता येतील.

स्थानिक विकास निधी कोणत्या ना कोणत्या नावाखाली हडप करण्याचे काम जोरात सुरु आहे.स्मशान शेड,बस थांबे,हि त्याची ताजी उदाहरणे आहेत.उक्कडगावात वैजापूर कडे जाताना एक नदी वजा ओढा लागतो तेथील स्मशानशेडचा वापर थेट आपल्या शेळ्या व मेंढ्या वापरण्यासाठी होत असल्याचे जाणारा येणाराला सहजच नजरेत येते.नव्याने बाधत असलेले बस थांब्याचे शेड तर माणसासाठी आहे कि जनावरांसाठी याचा शोध घेणे औत्सुक्याचे ठरेल.त्याला केवळ बाह्य भागात जाहिरातीचे फलक लावण्यासाठीची केवळ चौकट वाटावी अशीच स्थिती आहे.मध्ये ना फरशी ना मुरूम टाकलेला.त्याची उदघाटने सध्या जोरात सुरु आहेत.काही गावांचे बस थांबे राहिले एकीकडे व हे शेड बांधले भलतीकडे.त्यांची ग्रामपंचायतीची परवानगी किंवा ना हरकत आहे असे वाटत नाही.माहिती अधिकारात त्याची चौकस कार्यकर्त्याने करणे इष्ट.

आता तालुक्याच्या नैऋत्येकडे तेरा गावांना वरदान ठरणाऱ्या उजनी चारी उर्फ रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजनेचेच उदाहरण घ्या,राहता तालुक्यातील साई गंगा योजना हि त्या नंतरची.मात्र ती चालू झाली आहे.त्यातून राहाता तालुक्यातील दुष्काळी गावांचे तलाव भरून देण्यास शासनाने काही आठवड्यापुर्वीच प्रारंभ केला मात्र इकडे उजनीच्या पाण्याला हि मंडळी दहाव्या तेराव्यांच्या कावळ्या सारखे शिवण्यास अद्याप तयार नाही. या भागातील शेतकऱ्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली कि हि मंडळी फक्त अंग झटकण्याचे सोंग आणतात.निवडणुका पाहून खोटी उदघाटने करतात.गोदावरीतून जवळपास शंभर टी. एम.सी.पाणी खाली जायकवाडीत वाहून गेले.पण यांनी गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांना पाणी काही वाहू दिले नाही.जवळपास दोन अडीच महिन्यापासून गोदावरी वाहते पण यांनी डोळ्यावर कातडे ओढून घेतले आहे.रस्त्यांचीच तर गोष्टच काढू नका तालुक्यातील रस्ते फक्त कागदावरच झाले आहे,वास्तविक जीवनात नागरिकांनी ठोकरा खाऊनच मरणे इष्ट आहे.एखाद्या मंत्र्याला तालुक्यात रस्ते पाहाणीला खरे तर बोलविण्याचे निमंत्रण द्यायलाच हवे आहे.म्हणजे जनतेच्या हाल अपेष्टांची वास्तविक जाणीव होऊ शकेल.

सध्या आहे तो स्थानिक विकास निधी कोणत्या ना कोणत्या नावाखाली हडप करण्याचे काम जोरात सुरु आहे.स्मशान शेड,बस थांबे,हि त्याची ताजी उदाहरणे आहेत.उक्कडगावात वैजापूर कडे जाताना एक नदी वजा ओढा लागतो तेथील स्मशानशेडचा वापर थेट आपल्या शेळ्या व मेंढ्या वापरण्यासाठी होत असल्याचे जाणारा येणाराला सहजच नजरेत येते.नव्याने बाधत असलेले बस थांब्याचे शेड तर माणसासाठी आहे कि जनावरांसाठी याचा शोध घेणे औत्सुक्याचे ठरेल.त्याला केवळ बाह्य भागात जाहिरातीचे फलक लावण्यासाठीची केवळ चौकट वाटावी अशीच स्थिती आहे.मध्ये ना फरशी ना मुरूम टाकलेला.त्याची उदघाटने सध्या जोरात सुरु आहेत.काही गावांचे बस थांबे राहिले एकीकडे व हे शेड बांधले भलतीकडे.त्यांची ग्रामपंचायतीची परवानगी किंवा ना हरकत आहे असे वाटत नाही.

माहिती अधिकारात त्याची चौकस कार्यकर्त्याने करणे इष्ट.अनेक गावात विविध कामांचे भूमिपूजन करण्याचे डाव जोरात सुरु आहेत मात्र त्यांना मंजुरी आहे कि नाही त्याची खातरजमा चौकस कार्यकर्त्यांनी करायला हवी आहे.गत लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेली बरीच कामे स्वतःच्या नावावर खपविण्याचे उद्योग जोरात सुरु आहे. आय.टी. आय.ची इमारत जैसे थेच आहे.कोपरगावातील भूमिगत विद्युत वाहिन्यांकडे कोणी ढुंकूनही पहिले नाही मात्र स्रेय घेऊन मोकळे झाले आहेत.गत नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी मंजूर नसलेल्या कामांची भूमिपूजन झाल्याची उदाहरणे अनेकांना स्मरत असतील.तर लोकप्रतिनिधींच्या जवळच्या नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बरीच उदघाटने झाल्याचे शहरवासीयांना आठवत असेल त्यातील बऱ्याच कामांना मंजुरीचे नव्हती अशी माहिती नंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जाहीर केली.त्यामुळे गावात किंवा खेड्यात उदघाटन झाली असल्यास किंवा होणार असल्यास खातरजमा केलेली कधीही उत्तम.नंतर निवडणुकीत मते लाटून गेल्यावर काही उपयोग नाही.पाच वर्ष हि मंडळी जीभल्या चाटत तुमच्या कडे कशी अलगद शिकार केली म्हणून पाहत बसणार आणि तुम्ही फसलो म्हणून हात चोळत.याला काही अर्थ नाही.वेळीच शहाणपण फायद्याचे ठरते.पाखरांनीं शेत खाऊन गेल्यावर उपयोग होत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close