कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील..या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल,तालुक्यात खळबळ
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जवळके ग्रामपंचायतीचे सरपंच बाबुराव कारभारी थोरात यांचेवर सात पैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार कोपरगाव यांचेकडे दाखल केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या ग्रामपंचायतीची तीन वर्षांपूर्वी निवडणूक संपन्न झाली होती मात्र सरपंच यांनी या सदस्यांना विश्वासात घेतले नाही,अधिकाराचा दुरुपयोग,कर्तव्यात कसूर करणे,ग्रामपंचायतीच्या ठरावाची अंमलबजावणी न करणे,पंचायतीच्या कामकाजात दिरंगाई करणे आदी कारणे यात दिली आहे.
जवळके या ग्रामपंचायतीची तीन वर्षांपूर्वी निवडणूक संपन्न झाली होती मात्र सरपंच यांनी या सदस्यांना विश्वासात घेतले नाही,अधिकाराचा दुरुपयोग,कर्तव्यात कसूर करणे,ग्रामपंचायतीच्या ठरावाची अंमलबजावणी न करणे,पंचायतीच्या कामकाजात दिरंगाई करणे आदी कारणे या अविश्वासात सत्ताधारी गटाच्या सदस्यांनीच दिली आहे हे विशेष !
या बाबतचा अविश्वास ठराव प्रत त्यांनी निवासी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांचेकडे सुपूर्त केला असून त्यांनी या वेळी उपस्थित सदस्यांची ओळख परेड घेतल्यानंतर हा ठराव दाखल करून घेतला आहे.
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंम्बर २०१६ मध्ये संपन्न झाली होती.त्यावेळी राज्यात भाजप सरकार सत्तेत असल्याने त्यांनी जनतेतून सरपंच निवडणूक घेण्याचे जाहीर केले होते.त्या प्रमाणे या निवडणुकीत तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे (आ.काळे गटाचे) सरपंच पदाचे उमेदवार बाबुराव थोरात यांना भाजप,परजणे तीन गटांनी एकत्र येऊन हि निवडणूक स्थानिक सत्यशोधक गटाविरुद्ध लढवली होती.त्यात मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा थोरात यांना मिळाला होता.व त्यात ते निवडून आले होते.व त्यांच्या सोबत विविध गटांचे अन्य चार सदस्य निवडून आले होते.तर स्थानिक सत्यशोधक या वैचारिक गटाचे बिन पैशाचे मतदारांनी निधी संकलन करून तीन सदस्य निवडून दिले होते.मात्र गत तीन वर्षात गावात नागरिकांच्या प्राथमिक गरजांची पुर्ती हा सत्ताधारी गट करू शकला नव्हता.व गावात एकही ठळक काम सरपंच थोरात यांना करता आले नव्हते.ग्रामस्थांची पाण्याची साधी गरज या पदाधिकाऱ्यास पुरवता आली नाही त्यामुळे या गटातील तीन सदस्य नाराज होते त्यांनी याबाबत अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी बोलून दाखवूनही उपयोग झाला नव्हता त्यामुळे याबाबत माजी सरपंच बंडोपंत थोरात यांनी या गटाला धक्का देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.त्यांना भाजपचा एक सदस्य यांनीही साथ दिली आहे.त्यामुळे हा अविश्वास ठराव तीन तिघाड्यातून दाखल झाल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील लोकनियुक्त सरपंचाविरुद्ध पहिला अविश्वास दाखल झाल्यानंतर हा दुसरा अविश्वास ठराव दाखल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.या पूर्वी राज्यात असे वीसहुन अधिक ग्रामपंचायतीत असे ठराव संमत झाले आहे.
विशेष म्हणजे विरोधी गटाने विकासकामांना गत तीन वर्षात कुठलाही विरोध केलेला नसतानाही सदर वादग्रस्त पदाधिकाऱ्यास विकास कामांची एकही वीट गावात ठेवता आलेली नाही.व स्वतःच्या गटाचे सदस्यही सांभाळता आलेले नाही की स्वपक्षाचे मतदारही वाढवता आलेले नाही.हा मुद्दा ग्रामस्थांच्या चर्चेच्या अग्रस्थानी आहे.त्यामुळे आता नगर जिल्हाधिकारी याबाबत काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
या अविश्वास ठरावावर सत्ताधारी गटाचे ग्रामपंचायत सदस्य गणेश भास्कर थोरात,कविता खंडू थोरात,उपसरपंच मंदा सुधाकर थोरात,यांचेसह स्थानिक सत्यशोधक पॅनलचे प्रकाश गोरक्षनाथ थोरात,विजय साहेबराव थोरात,श्रीमती मालती अनिल थोरात आदीं सहा सदस्यांनी पाठिंबा दिला असून त्या ठरावावर त्यांच्या सह्या आहेत.