जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा-मागणी

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी तालुका प्रशासनाने लवकरात लवकर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत शहर शिवसेनेने तहसीलदारांना निवेदन दिले आहे.त्यामुळे आता टाळेबंदी करण्याबाबत प्रशासनावर दबाव वाढण्यास सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे.तरी देखील शहर व ग्रामीण भाग मिळून रोज शंभराच्या वर रुग्ण आढळत आहे.सद्यपरिस्थितीत नियंत्रण मिळवण्यासाठी शहराप्रमाणे ग्रामीण भागात गटनिहाय तात्पुरते कोविड सेंटर सुरू करावे-कलविंदरसिंग दडियाल शहर प्रमुख शिवसेना.

कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०४ हजार ४९७ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ५३९ असून आज पर्यंत ५२ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.१६ टक्के आहे.तर एकूण २४ हजार ३८२ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९७ हजार ५२८ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १८.४४ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ९६२ इतकी झाली आहे त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर शिव सेनेने हि भूमिका घेतली आहे.

कोपरगाव सेनेने तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,”तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे.तरी देखील शहर व ग्रामीण भाग मिळून रोज शंभराच्या वर रुग्ण आढळत आहे.सद्यपरिस्थितीत नियंत्रण मिळवण्यासाठी शहराप्रमाणे ग्रामीण भागातही तात्पुरते कोविड सेंटर सुरू करावे,जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येकी एक कोविड सेंटर सुरू करावे,ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करावे,उपचारांती रुग्ण विलगिकरणात राहतो की नाही याबाबत लक्ष ठेवण्यास ग्राम सुरक्षा समितीला अधिकार द्यावे,मास्क वापरण्यास सक्ती करून विना मास्कवाल्यांकडून दंड वसूल करावा,व्यापारी व भाजीपाला विक्रेत्यांच्या कोविड-19 चाचण्या (मोफत) करून प्रमाणपत्र द्यावे.अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

सदर निवेदन देताना सेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,उपतालुका प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close