कोपरगाव तालुका
आत्मा मालिकमध्ये सद्गुरू वंदना महोत्सवाचे आयोजन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव( प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या प्रकटदिनानिमित्त अनंद चतुर्दषीच्या मुहुर्तावर दि. 12 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महोत्सवाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संत परमानंद महाराज यांनी दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, अनंत चतुर्दशीच्या (प्रकटदिनाच्या) मंगलमुर्हतावर सालाबादप्रमाणे याहीवर्शी सद्गुरू वंदना महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सद्गुरू माउलींनी केलेल्या खडतर तपश्चर्येनंतर संपूर्ण विश्वाला ध्यानमार्गाने घेउन जाण्याचे वैश्विक आदेश सद्गुरूंना याच तिथीला आत्मशक्तीकडून प्राप्त झाले. अनंताने अनंताला याच तिथीला ध्यानकार्यासाठी अनंत आशिर्वाद दिले, म्हणून हा दिवस सर्व साधकांच्या वतीने दरवर्शी प्रकटदिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्व साधक या दिवशी आपल्या सद्गुरू प्रती प्रेमभाव व्यक्त करतात.
सद्गुरू माउलींनी केलेल्या खडतर तपश्चर्येनंतर संपूर्ण विश्वाला ध्यानमार्गाने घेउन जाण्याचे वैश्विक आदेश सद्गुरूंना याच तिथीला आत्मशक्तीकडून प्राप्त झाले. अनंताने अनंताला याच तिथीला ध्यानकार्यासाठी अनंत आशिर्वाद दिले, म्हणून हा दिवस सर्व साधकांच्या वतीने दरवर्शी प्रकटदिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्व साधक या दिवशी आपल्या सद्गुरू प्रती प्रेमभाव व्यक्त करतात.
तसेच या निमित्ताने विश्वात्मक कार्यामध्ये अमूल्य योगदान दिलेले ‘सकल हृदयनिवासी संतांचे व साधकांचे आत्मस्मरण’ व त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञताभाव म्हणून त्यांना आत्मवंदना केली जाणार आहे. असे यावेळी त्यांनी सांगितले.
या महोत्सवाची सुरूवात पहाटे 5.30 वा. आत्मरूप पुजन व काकडआरतीने होणार असून दिवसभर भजन, प्रवचन, सत्संग हे कार्यक्रम संपन्न होणार आहे. सायं 6 ते 9 या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक गरबानृत्य, सामुहिक ध्यानपीठ व संध्या आरती होणार असून रात्री 9 ते 9.30 या कालावधीत अनुग्रहाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 10 ते 12 या कालावधीत भजन, प्रवचन व मौनध्यान होईल व शेज आरतीने रात्री 12 वा या महोत्सवाची सांगता होईल.
तरी या महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांनी संत अमृतवाणी तसेच दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत विवेकानंद महाराज यांनी केले आहे.