कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा फाफट पसारा सुरूच
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार २४१ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या १३९ असून आज पर्यंत ४८ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.४८ टक्के आहे.तर एकूण २१ हजार ९०८ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ८७ हजार ६३२ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १४.७९ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ०५४ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ९४.२३ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरात आज आलेल्या एकूण १३ बाधित रुग्णांत श्रद्धानगरी पुरुष वय-६०,लोणकर वस्ती महिला वय-४६,कांचन कंपाऊंड कोपरगाव येथील महिला वय-६५,एक बालक वय-०६,कृष्णाई मंगल कार्यालयासमोर एक पुरुष वय-४५,रेल्वे स्थानक पुरुष वय-३८,बागुल वस्ती एक पुरुष वय-५२,कोपरगाव पुरुष वय-३०,७०,कासलीवाल कंपाऊंड एक महिला वय-६२,गरवारे नगर पुरुष वय-३०,सुभाद्रनगर महिला वय-४१,म्हसोबा मंदिराजवळ कोपरगाव पुरुष वय-६२ आदींचा समावेश आहे.
तर तालुक्यात आज आलेल्या आकडेवारीत बाधित २१ रुग्णांत शिंगणापूर दोन पुरुष वय-३८,३७,एक महिला वय-६५,कोकमठाण दोन महिला वय-६२,३२,जी.प.शाळेजवळ कोकमठाण एक पुरुष वय-२६,तीनचारी कोपरगाव पुरुष वय-४०,टाकळी ०१ महिला वय-५५,न्हाई गल्ली टाकळी पुरुष वय-६१,तर शहाजापूर पुरुष वय-२३.पोहेगाव बु.,महिला वय-१६,कोळपेवाडी मोतीनगर पुरुष वय-३१,एक महिला वय-३४,करंजी मारुती मंदिराजवळ पुरुष वय-४६,वारी महिला वय-३४,कारवाडी दोन महिला वय-०४,२७,धोत्रे पुरुष वय-५५,माहेगाव पुरुष वय-४५,शिंदे वस्ती तीळवणी महिला वय-४०, आदींचा समावेश आहे.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.