जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावच्या माजी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर कोपरगावात हजर !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगावच्या माजी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर या दि.बावीस एप्रिल रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव न्यायालयात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी नुकत्याच रविवार दि.आठ सप्टेंबर रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी झाल्या असून त्यांचा जबाब पोलीस उप निरीक्षक भारत नागरे यांनी नोंदवला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव नगरपरिषदेत वितरित करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने आरोपी विलास दशरथ आव्हाड तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर व रवींद्र पाठक यांचे संमतीने पाणी पुरवठ्याचे टेंडर देण्यात आले होते.सदर पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आरोपी विलास आव्हाड यास नगरपरिषदेने दोन लाख दहा हजार 178 रुपयांचे बिल अदा केले होते.वास्तविक सदरचे काम झाले किंवा नाही याची खातरजमा तत्कालीन मुख्याधिकारी दरेकर यांनी व पाणी पुरवठा अभियंता प्रकाश लोखंडे यांनी करणे गरजेचे होते तशी त्यांनी ती केली मात्र ती खातरजमा भ्रष्टाचार करण्याचे हेतूने कागदोपत्री करून सदरचे बिल मंजूर केले. या संदर्भांत माहिती अधिकार संजय काळे यांनी माहिती अधिकारात या बाबत माहिती मागवली त्यात त्यांना धक्कादायक माहिती आढळली ती अशी कि,ज्या वाहनाने त्यांनी पाणी पुरवठा केल्याचे दाखवले त्यात चक्क दुचाकी,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा ट्रॅक्टर आदी वाहनांचा वापर केला असल्याचे काळे यांनी उघड केल्याने कोपरगावात खळबळ निर्माण झाली.ठेकेदार विलास आव्हाड याने बनावट वाहने दाखवून खोटे कागदपत्र दाखवून कोपरगाव शहरातील नागरिकांची फसवणूक केल्याचे त्यामुळे उघड झाले.

ज्या वाहनाने कोपरगाव पालिकेला आरोपी विलास आव्हाड पाणी पुरवठा केल्याचे दाखवले त्यात चक्क दुचाकी,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा ट्रॅक्टर आदी वाहनांचा वापर केला असल्याचे काळे यांनी उघड केल्याने कोपरगावात खळबळ निर्माण झाली.ठेकेदार विलास आव्हाड याने बनावट वाहने दाखवून खोटे कागदपत्र दाखवून कोपरगाव शहरातील नागरिकांची फसवणूक केल्याचे त्यामुळे उघड झाले.

त्या बाबत त्यांनी कोपरगाव न्यायालयात तसा दावा बावीस एप्रिल 2019 रोजी दाखल केला होता.या प्रकरणी न्यायालयाने जा.क्रं.1377-2019 अन्वये सी.आर.पी.सी.कलम 156(3) प्रमाणे आरोपी विलास आव्हाड यांचेवर गुन्हा दाखल करणे बाबत व अन्य आरोपी शिल्पा दरेकर रवींद्र पाठक, नगराध्यक्ष विजय वहाडणे,व पाणीपुरवठा अभियंता प्रकाश लोखंडे यांच्या गुन्ह्या बाबत प्रारंभिक चौकशी करून त्या बाबत पुढील कायदेशीर कारवाई करावी असे आदेश न्यायालयाने दिलेले होते.त्यांनतर चौकशी अधिकारी भारत नागरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या बाबत सातत्याने पाठपुरावा करून शिल्पा दरेकर यांना चौकशीसाठी बोलावले होते मात्र त्यांनी सातत्याने टाळाटाळ चालवली होती मधल्या काळात सांगली,कोल्हापूर आदी ठिकाणी नद्यांना पूर आल्यानेही त्यांना जमले नव्हते तथापि त्यांनी रविवारी आठ सप्टेंबर रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावली असून या प्रकरणात आपला जबाब नोंदवला आहे.या प्रकरणात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह बहुतांशी जबाब पूर्ण झाले आहे.बाकी चौकशी पूर्ण होऊन त्या नंतर हा अहवाल न्यायालयासमोर जाणार असून त्यानंतर या आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करायचे कि नाही या बाबत न्यायालय निर्णय घेणार आहे या प्रकरणाकडे कोपरगावच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close