स्पर्धा
तरुणांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी मैदानी स्पर्धां आवश्यक-..यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना साथीच्या पश्चात तरुणांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी मैदानी स्पर्धांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.
“वर्तमानात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून आजपर्यंत ५ सुवर्ण,५ रौप्य व ४ कास्य अशा एकूण १४ पदकांची कमाई केली आहे.यामध्ये राज्यातील खेळाडूंचा देखील समावेश असून त्यांनी देखील पदक पटकाविले ही आपल्या साठी अभिमानास्पद बाब आहे.या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मेहनत घ्यावी”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,साईबाबा संस्थान शिर्डी.
शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगावात आ.काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार (दि.०४) रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विविध वयोगटात शेकडो स्पर्धकांनी भाग घेतला होता.स्पर्धकांना आ.काळे यांनी शुभेच्छा दिल्या.त्यांच्या हस्ते तिरंगा ध्वज दाखवत स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी स्नेहलता शिंदे,तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,महिला शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार,महिला जिल्हा सचिव रेखा जगताप,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,युवती शहराध्यक्षा माधवी वाकचौरे,विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार आदींसह आजी माजी नगरसेवक,सर्व सेल अध्यक्ष,पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की,”वर्तमानात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून आजपर्यंत ५ सुवर्ण,५ रौप्य व ४ कास्य अशा एकूण १४ पदकांची कमाई केली आहे.यामध्ये राज्यातील खेळाडूंचा देखील समावेश असून त्यांनी देखील पदक पटकाविले ही आपल्या साठी अभिमानास्पद बाब आहे.या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मेहनत घ्यावी.आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य दाखवून यश मिळवावे व आपल्या देशाची मान उंचवावी असा मौलिक सल्ला दिला.भविष्यात देखील मॅरेथॉन स्पर्धेप्रमाणेच इतरही मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करून स्पर्धा भरविण्यासाठी खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिली.यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध गटातील विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते रोख पारितोषिक देवून गौरव करण्यात करण्यात आला होता.