जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माजी आमदार नगरसेवकांच्या माध्यमातून घेत आहे शहरातील जनतेचा बदला-आरोप

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)-

कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत बांधकाम विभागाचे सर्व विषय नामंजूर करून शहरविकासासाठी खोडा घालण्याचे काम केले आहे. प्रत्येक कामात त्यांना भ्रष्टाचाराचा वास वाटतो असे सांगून शहर विकास झाला तर याचे सर्व श्रेय आ. आशुतोष काळे यांना जाईल या भीतीपोटी शहरातील मुख्य रस्त्यांचे रस्त्यांच्या कामाला खोडा घातला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार काळे यांना शहरवासीयांनी आ.आशुतोष काळे यांना दिलेल्या अडीच ते तीन हजारांच्या लीड मुळे माजी लोकप्रतिनिधी आता त्यांच्या भाजप नगरसेवक यांच्या माध्यमातून शहरातील जनतेचा बदला घेत असल्याचे जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व नगरसेवक संदीप वर्पे यांनी केला आहे.

शिवसेनेचे दोन नगरसेवक हे महाविकास आघाडी सोबत विकासाच्या मुद्द्यावर आहेत तर काही शिवसेनेचे नगरसेवक भाजपा बरोबर पाकिटासाठी आहे. त्यांना पक्षाचे देणेघेणे नाही-सपना मोरे,राष्ट्रवादी सॊबतच्या नगरसेवक.

कोपरगाव नगरपरिषदेने नुकतीच शहरातील सुमारे एकतीस रस्त्यांची कामे मंजुरीसह जवळपास एकोणतीस विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती त्यात भाजप कोल्हे गटाने शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांच्या मंजुरीसाठी आधी स्थायी व नंतर सर्वसाधारण सभेत खोडा घातल्याने वादंग निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्र वाडी काँग्रेसने गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी हा आरोप केला आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, नगरसेवक मंदार पहाडे,विरेन बोरावके,नगरसेविका माधुवी राजेंद्र वाघचौरे , शिवसेनेच्या नगरसेविका सपना मोरे, वर्षा शिंगाडे,अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद,धरम बागरेचा,राजेंद्र वाकचौरे,
शिवसेना शहरप्रमुख कलविंदर दडियाल,राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगूले आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी अधिक बोलतांना वर्पे म्हणाले की,अंदाजे साडे आठ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. या रस्त्यांना निधी १४ व्या वित्त आयोगाचा असून त्याची मुदत संपली आहे.त्यामुळे याचे फेर अंदाजपत्रक बनवणे म्हणजे जवळपास आठ कोटींचा निधी गमावणे होय.त्यामुळे हा ठराव नामंजूर करू नये अशी रास्त मागणी केली आहे.फार तर यातील जी खडीकरणासारखी कामे वाढीव असतील ती रद्द करा.वास्तविक हि कामे नवीन दरपत्रकाप्रमाणे आहे.त्यासाठी कोल्हे गटाच्या कालावधीतील सन २०१० सालातील शासकीय दरपत्रकांचा दाखला दिला व त्यावेळी डिजलचे दर ४७-४८ रुपये प्रतिलीटर होते आज ते ८७ रुपयांवर गेले आहे.त्यामुळे दर ठरवताना डी. एस.आर.चा विचार केला जातो त्या मूळे आजचे दर योग्य असल्याची शिफारस केली आहे.एस.जी.रोडवर आपले बालपण गेले आहे.शिवाय त्या रस्त्यावर एस.जी.शाळा कन्या शाळा.व गांधीनगर व अनेक उपनगरे असल्याचे सुचवून अन्य सदस्यांना वास्तवाचे भान आणून दिले आहे.तीच बाब अन्य रस्त्यांची असल्याचे लक्षात आणून दिली.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हि यंत्रणा त्यावेळी व गत चार वर्षात अंदाज पत्रक बनवताना चालली असताना आजच ती यंत्रणा का एकाएकी वाईट कशी झाली ? असा सवाल वर्पे यांनी उपस्थित केला.
यावेळी सुनील गंगुले म्हणाले की, सर्व विषय समित्यांचे सभापती हे भाजपाचे आहे रस्त्यांच्या कामाबाबत जर तुम्हाला शंका वाटत होती तर त्यावेळेस का आक्षेप घेतला नाही तेव्हा झोपले होते का? राजकारण राजकारणाच्या ठिकाणी द्यावा शहरातील जनतेला वेठीस धरू नका.
मंदार पहाडे म्हणाले की, भाजपाचे नगरसेवक हे फक्त भ्रष्टाचाराच्या मुद्या खाली झोपल्याचे सोंग घेत आहे फक्त विकासाची कामे नामंजूर करायची एवढेच त्यांचे ध्येय आहे.

नगर पालिका सर्वसाधारण सभेत जो प्रकार घडला तो निंदनीय असून पालिकेत गलिच्छ राजकारण होत आहे.शिवसेना पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडी बरोबर असून शिवसेना ही महाविकास आघाडीचा एक भाग असून आम्ही एकत्र आहे हीच अधिकृत भूमिका आहे.
– कलविंदर दडीयाल शिवसेना शहर प्रमुख

गटनेते विरेन बोरावके म्हणाले की, जनरल मिटिंग मध्ये पहिल्याच विषयापासून भाजप नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचे काम सुरू केले साठवण तलावाच्या विषय आपल्या अंगलट येईल हे बघून त्यांनी त्या विषयाला मंजुरी दिली. येसगाव तलावातील सौर ऊर्जा प्रकल्पाला केवळ श्रेय वादासाठी नामंजूर केला आहे.
मेहमूद सय्यद म्हणाले की, ह्या शहर विकासाच्या कामात सर्व नगर सेवकांचे काम होणार आहे.शहरात वाढलेल्या धूळीमुळे जनता वैतागलेली असून भाजपाचे नगराध्यक्ष ,नगरसेवक व माजी आमदार यांचा पराभव झाल्यामुळे ते जनतेला चांगलाच धडा शिकवला पाहिजे असे वागत आहे.तर गांधीनगर भागातील काही नगरसेवक 25-30 वर्षांपासून निवडून येत आहे तरी देखील ते रस्त्याला विरोध करून शहर विकासाला खोडा घालण्याचे काम करत असून ज्यालोकांनी काळे यांना मते दिले आहेत त्यांना त्रास देण्याचे काम भाजपा नगरसेवक व माजी आमदार करत आहे.तर शहर विकासा व्हावा ही भाजपची इच्छा नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close