कोपरगाव तालुका
दुर्मिळ बहिर ससाण्यास कोपरगावात पक्षी प्रेमींकडून जीवदान
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2021/02/images286429-440x405.jpeg)
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी काठालगत जेऊर पाटोदा हद्दीत बहिर ससाना हा दुर्मिळ जमाताचा पक्षी जखमी अवस्थेत पक्षीप्रेमी बिंदरसिंग शेखो यांना आढळून आला आहे.त्याला स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके यांनी जीवदान दिले आहे.
बहिरी ससाणा हा भारतात अतिशय दुर्मिळ पक्षी असून ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे.गडद हिरव्या रंगाचे टोकदार पंख,चपळ शरीर,व अतिशय वेगवान हालचाली करून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत आहे.
बहिरी ससाणा हा भारतात अतिशय दुर्मिळ पक्षी असून ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे.गडद हिरव्या रंगाचे टोकदार पंख,चपळ शरीर,व अतिशय वेगवान हालचाली करून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत आहे. डोळ्याच्या बाजूचे पिसांचे कल्ले यांवरून हा पक्षी ओळखता येतो.बहिरी हे मूळचे नाव अरबी असून अरबी भाषेत बहारी असे म्हणतात. इंग्रजीत हा पेरेग्रीन फाल्कन या नावाने ओळखला जातो. आखाती देशात याला माणसाळवून शिकारीसाठी वापरतात.
तसे कळविल्यावर त्यांनी जखमी पक्षाची जमात लक्षात घेत.त्यांचे पंख व मानेला गंभीर ईजा झालेचे लक्षात आलेवर त्याचेवर कोपरगाव येथील लघु पशू चिकित्सालय येथे दाखल केले.तेथे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.अजयनाथ थोरे,पशुधन विकास अधिकारी डॉ.श्रध्दा काटे यांनी औषध- उपचार केले.त्यानंतर त्यांच्या मंदावत चाललेल्या हालचाली सुस्थितीत आल्यावर त्यास वन विभागाचे भाऊसाहेब कुळधरण, लक्ष्मण थोरात यांचे कडे सुपुर्द केला नंतर त्यास वनविभाग मार्फत अभय अरण्यात सोडुन दिला आहे.या प्रसंगी पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके म्हणाले,गोदावरी नदीकाठावर पाण्याच्या शोधात अनेक दुर्मिळ जमाताच्या पशू-पक्षांची भटकंती असते.अशाच दुर्मिळ होत चाललेल्या पक्षांच्या जमातीतील वनविभागाने सुची -१ मध्ये समाविष्ट केलेल्या पक्षांमध्ये बहिर ससाणा पक्षी आहे.पर्यावरणाचा समोतोल राखण्यासाठी दुर्मिळ होत चाललेल्या पशू-पक्षांचे संरक्षण होणे काळाची गरज आहे.सर्वांनी पर्यावरणावर प्रेम करावे असे सांगितले आहे..