कोपरगाव तालुका
माती परिक्षणांनुसार खत व्यवस्थापन करावे-आढाव
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावे असे आवाहन कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“खत व्यवस्थापन करताना जमीन आरोग्य पत्रिकेनुसार व्यवस्थापन केल्यास खताच्या खर्चामध्ये बचत होईल योग्य ते अन्नद्रव्ये उपलब्ध करुन दिले पाहिजे”-अशोक आढाव,तालुका कृषी अधिकारी.
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,मंडल कृषी अधिकारी,कोळपेवाडी,अविनाश चंदन,कृषी पर्यवेक्षक आदिनाथ आरणे,शेतीशाळा प्रशिक्षक निलेश बिबवे,कृषी सहाय्यक विजय कौर सरपंच विकासराव मोरे,उपसरपंच ताराचंद मोरे,नारायण मोरे,संतोष मोरे, अशोक मोरे,बाबासाहेब गंगाधर मोरे,शेतकरी विज्ञान मंडळाचे गोरख मोरे,कृषी विभागाचे दिगंबर चव्हाण, विजय अहिरे आदीं मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शेतकरी बंधूंना खत व्यवस्थापन करताना जमीन आरोग्य पत्रिकेनुसार व्यवस्थापन केल्यास खताच्या खर्चामध्ये बचत होईल योग्य ते अन्नद्रव्ये उपलब्ध करुन दिले पाहिजे.त्याचबरोबर शेतकऱ्यांनी एन.पी.के.या खतांबरोबरच सूक्ष्म मूलद्रव्य झिंक फेरस, मॅग्नेशिअम सल्फेट,सिलिकॉन आदींचा वापर शेतीमध्ये कांदा पिकासाठी करणे आवश्यक असून योग्य कीडरोग निरीक्षणातून आपल्याला शेतीवर होणारा उत्पादन खर्च कमी करता येईल असे प्रतिपादन केले आहे. यावेळी अविनाश चंदन यांनी शासनाचे संत शिरोमणी रयत बाजार अभियान,विकेल ते पिकेल अभियान,कांद्याचे कीड-रोग व्यवस्थापन आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक निलेश बिबवे यांनी केले. या उपक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कृषी सहाय्यक विजय कोर यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.