कोपरगाव तालुका
नगरसेवकांस मारहाण,बागुल यांची दिलगिरी,तर रस्त्याच्या कामाचा काथ्याकूट
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांच्या परिवाराला एका ठेकेदाराकडून झालेल्या मारहाण प्रकरणी त्यांनी कोपरगाव नगरपरिषदेत नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केल्यावर या प्रकरणी सभेत शिवसेनेचे नगरसेवक योगेश बागुल यांनी दिलगिरी व्यक्त केली असून त्या बाबत भाजप गटनेते रवींद्र पाठक,कैलास जाधव यांनी सहानुभूती व्यक्त केल्याने हा प्रश्न आता मिटला असल्याचे मानले जात आहे.
काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकू म्हणतात मात्र कारवाई होत नाही माझ्या गांधीनगर प्रभागातील एकही काम घेतले जात नाही मला एकही समितीवर घेतले नाही (असे मेहमूद सय्यद म्हणताच सभागृहात हशा पिकला) ठेकेदाराने माझ्यावर हल्ला केला व पालिकेत चार-पाच जणांची मक्तेदारी कशी चालते असा सवाल केला व आपण कोणाकडून भा..डं घेत नाही असा आक्षेपार्ह शब्द प्रयोग केल्याचे अनेकांना जाणवले मात्र त्यांनी या शदाचा संधिविग्रह करून भाडं नाही तर आपण भा..ड (मोबदला ) असे म्हणायचे असल्याचे निर्देश केल्याने वाद टळला आहे.व बाकी नगरसेवकांच्या विस्फारलेल्या नजरा खाली वळल्या असल्याचे दिसून आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांच्या गांधीनगर प्रभागातील गटारीचे व पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम गोसावी नावाच्या ठेकेदाराकडून सुरु होते.मात्र ते काम प्रलंबित झाल्याने तेथे एक जेष्ठ महिला गटारीत पडून तिला गंभीर दुखापत झाली होती.याबाबत नगरसेवक सय्यद यांनी दाद मागितली होती याचा राग येऊन आरोपी बंटी गोसावी,पप्पू गोसावी व त्यांच्या तीन ते चार सहकाऱ्यांनी नगरसेवक मेहमूद सय्यद यांच्या घरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुपारी एक वाजेच्या सुमारास कोणी नसताना त्यांच्या पत्नीस व त्यांना मारहाण केली होती.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.त्या नंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे व पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी दोन्ही गटात समझोता करून लेखी देऊन प्रकरण मिटवले होते.त्याचे पडसाद काल संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले आहे.विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक अकरावर रस्त्याच्या एकतीस कामांना मंजुरी देण्याचा विषय तावातावाने चर्चा सुरु होती.त्यावेळी उपनगराध्यक्ष निखाडे यांनी रस्त्यांच्या कामाचा विषय उपस्थित केला त्यावर भाजपचे संजयनगर मध्ये नगरसेवक अल्ताफ कुरेशी यांनी ठेकेदार वेळेवर काम करत नाहीत हा मुद्दा उपस्थित केला असता या विषयात नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी हा उपविषय उपस्थित केला होता.त्यावेळी ते नगरसेवक गटनेते रवींद्र पाठक,योगेश बागुल बोलत होते.त्या नंतर या विषयावर पडदा पडला आहे.
दरम्यान या वेळी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकू म्हणतात मात्र कारवाई होत नाही माझ्या गांधीनगर प्रभागातील एकही काम घेतले जात नाही मला एकही समितीवर घेतले नाही (असे म्हणताच सभागृहात हशा पिकला) ठेकेदाराने माझ्यावर हल्ला केला व पालिकेत चार-पाच जणांची मक्तेदारी कशी चालते असा सवाल केला व आपण कोणाकडून भा..डं घेत नाही असा आक्षेपार्ह शब्द प्रयोग केल्याचे अनेकांना जाणवले मात्र त्यांनी या शदाचा संधिविग्रह करून भाडं नाही तर आपण भा..ड (मोबदला ) असे म्हणायचे असल्याचे निर्देश केल्याने वाद टळला आहे.व बाकी नगरसेवकांच्या विस्फारलेल्या नजरा खाली वळल्या असल्याचे दिसून आले आहे.त्यावर त्याला मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.या वेळी राष्ट्रवादीचे विरेन बोरावके यांनी कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी लावून धरली.त्यावेळी नगराध्यक्ष वहाडणे यांनी आपण सर्वात प्रथम सय्यद यांना भेटण्यास गेलो होतो.त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण झाल्याचे व्रण दाखवले होते ठेकेदारांचे लाड होता काम नयेत अशी मागणी केली आहे.व आपल्या परवानगी शिवाय ठेकेदारांच्या शिफारशी कशा जातात असा अधिकाऱ्यांना उलट सवाल केला आहे.या पुढे अशा शिफारशी आपल्याला विचारल्याशिवाय जाता कामा नयेत अशी तंबी दिली आहे.व नगरसेवकांना ठेकेदारांच्या गळ्यात हात घालून फिरू नका आपल्या राजकीय संबंधांचा फायदा ठेकेदार घेतात असे स्पष्ट केले आहे.व ठेकेदारांच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान कैलास जाधव यांनी ज्या कामाचा उपयोग गावाला होणार नाही ती कामे कशाला घेता असा सवाल केला आहे.येवला रोडवर केवळ दोन खड्डे आहे त्यासाठी १.२७ लाखांचा खर्च कशासाठी करता अशी विचारणा केली आहे.या खेरीज साईबाबा कॉर्नरवर गोल गोडावून जवळचे एकवीस लाखांचे काम करून पैसे कशाला वाया घालता असा रास्त सवाल केला आहे.जेथे माणसे जात नाही केवळ डुकरे जातात त्या कामावर का खर्च करता असा सवाल केला आहे.भाजप गटनेते रवींद्र पाठक यांनी प्रभाग क्रं.१३ मधील माझे कोणते काम केले व दुकाने गेली नाही पाहिजे अशी मागणी केली आहे.व पूर्वी काम केलेल्या कुऱ्हाडे या ठेकेदारावर काय कारवाई केली असा सवाल केला आहे.व ठेकेदार एकाच्या नावावर काम घेतो व दुसराच करतो असा आरोप केला.त्याला उत्तर देताना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी काम देताना नगरसेवकच हस्तक्षेप करतात असा थेट आरोप केला आहे.या सभागृहात नाव घेतले तर गोंधळ होईल असा दावा केला.त्यावर उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी आज नावे जाहीर कराच असे थेट आव्हान दिले.त्यावेळी माजी नगराध्यक्ष यांच्या धर्मपत्नीकडे बोट करून वहाडणे यांनी थेट उल्लेख करताच त्यात संदीप वर्पे यांनी हस्तक्षेप केला व ठेकेदार म्हणजे काही मटक्याचे दुकान नाही.त्यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी काढलेल्या सरकार मान्य महाविद्यालयात पदव्या घेतल्या आहेत.त्यामुळे त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला करू नका असे म्हणून पुढील अनर्थ टाळला आहे.त्यावेळी दोन-चार ठेकेदारांच्या काम चुकारपणामुळे लोक आम्हाला बोलतात,दूषणे देतात असा दावा केला व त्या नगरसेवकांची नवे जाहीर कराच असे आव्हान देऊन निखाडे यांच्या सुरात सूर मिळवला त्यावेळी संदीप वर्पे यांनी आपण आपली हरकत मागे घेत असल्याचे सांगितले.त्यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी,”तुम्ही नाईलाजाने नावे सांगायला भाग पाडता आहात. व तुम्ही राजकारण डोक्यात ठेऊन त्या वेळी शिफारशी करता असा आरोप केला आहे.त्यामुळे गुणवत्ता प्रधान ठेकेदार काम करत नाही असा आरोप केला आहे.काही नगरसेवकांच्या शिफारशीमुळेच आपण माजी नगराध्यक्षाच्या मुलाला काम दिले असल्याचा आरोप केला.त्याला उत्तर देताना पाठक यांनी.”आज तुंम्ही नावे जाहीर कराच असे आव्हान दिले.त्यावेळी मध्येच हस्तक्षेप करत नगरसेवक सय्यद यांनी नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न आहे.त्या वेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी,”आपण स्थायीच्या सभेतही नाव घेण्याचे टाळले असल्याचे निदर्शनास आणले.त्यावेळी नगरसेवक अनिल आव्हाड यांनी नगराध्यक्षांना उद्देशून,”सर्वच ठीकठाक चालते असे नाही.एक बोट दुसरीकडे कराल तर चार बोटे आपल्याकडे आहेत” हे विसरू नका असे सूचक वक्तव्य केले व “नाव न घेता बोलता तेंव्हा सर्वांच्या भोवती संशय निर्माण होतो त्यामुळे पालिकेत कोण साव आहे तेही सांगा”असे आव्हान दिले आहे.कामे घेतात ते सर्वच चोऱ्या-माऱ्या करत नाही पण येथे कोण साव आहे तेही सांगा म्हणून आव्हान दिले आहे.त्यात हस्तक्षेप करत भाजप नगरसेवक सत्येन मुंदडा यांनी,”सुधारणा आपल्यालाच करायच्या आहेत,त्यामुळे कामे गुणवत्तेची करा” असे आवाहन वाद घालणाऱ्या नगरसेवक व पदाधिकारी यांना उद्देशून केले आहेत.त्या नंतर पुन्हा सभागृहाची गाडी रस्त्यांच्या ३१ कामाकडे निखाडे यांनी वळवली व या कामावरून पत्रकबाजीवरून एकमेकांना दूषणे देण्याचे काम सुरु झाले असल्याचे दिसून आले आहे.