जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भाजपची “कोपरगाव सत्यानाश मोहीम” फत्ते ?

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीने कोपरगाव शहरांतील विविध महत्वपूर्ण अठ्ठावीस रस्त्यांची कामे आज पाशवी बहुमताच्या आधारे फेटाळून लावण्याची दुर्घटना आज संपन्न झालेल्या विशेष सर्व साधारण सभेत घडली असुन त्याचे संपूर्ण स्रेय आज भाजपच्या कोल्हे गटाच्या नावावर नोंदले गेले असल्याने आज कोल्हे गटाची “कोपरगाव सत्यानाश मोहीम” फत्ते झाल्याने त्यांच्या गोटात समाधान पसरले आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी यावर तिखट शब्दात हल्ला चढवला आहे.यार शहरात नाराजी पसरली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेत आज रस्त्यांचा ठराव नामंजुरीच्या बाजूने भाजची अठरा तर मंजुरीच्या बाजूने नगराध्यक्षा सह अकरा मते पडली असल्याने हि कामे अखेर भाजपने आपल्या दुराग्रहाने अखेर नामंजूर करून आपला आतबट्याचा ठराव मंजूर करून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव हि खऱ्या अर्थाने “आसुरभूमी” असल्याचे निदर्शनास आणले आहे.त्यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीची बैठक दि.१२ जानेवारी रोजी नगरपालिका सभागृहात संपन्न झाल्या नंतर राष्ट्रवादीने स्थायी समितीत सोळा कामांना विरोध केल्या प्रकरणी आंदोलन छेडले होते.व घरोघरी पत्रके वाटून कोल्हे गटाचा शिमगा साजरा केला होता.त्याला उत्तर म्हणून कोल्हे गटानेही शहरात पत्रके वाटून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या.व त्या नंतर नगराध्यक्ष वहाडणे यांनी २८ पैकी १६ कामे मंजूर करून आमच्या प्रभागातील नगरसेवकांची कामे टाळल्याचा आरोप करून सर्वच्या सर्व २८ कामे मंजूर करावे अशी मागणी केली होती.व ती सर्व कामे पटलावर ठेवल्यावर त्यास मंजुरी देऊ असे आश्वासित केले होते.त्यानंतर ०२ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव नगरपरिषेदेने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभेचे आयोजन केले होते.त्या सभेत सर्वच्या सर्व कामे मंजुरीसाठी ठेवूनही कोल्हे गटाने पुन्हा एकदा कोलदांडा घातल्याने आश्चर्य व्यक्त गेले होते.त्या नंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपण या विकास कामांच्या मंजूरीसाठी लवकरच विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करून त्या सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेऊ असे आश्वासन दिले होते.ती सभा आज अकरा वाजता पालिकेच्या सभागृहात आज विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती त्या सभेस भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसचे व अपक्ष नगरसेवक मुख्याधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी पहिलाच विषय मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याचा होता.त्या विषयावरचं तब्बल दीड दोन तास काथ्या कूट चालला होता.त्या साठी एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवक यांनी धाडल्या त्यात नगरसेवक संदीप वर्पे,गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,मेहमूद सय्यद आदी आघाडीवर होते.अखेर साडे तीन वाजेच्या सुमारास भाजप कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी प्रदीर्घ चर्च नंतर आजच्या विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ११ हा चर्चेस आला असता बांधकाम विभागा कडील विविध विकास कामांच्या प्राप्त निविदा प्राप्त निविदांवर मंजुरीबाबत दि.०१ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेतील निर्णयावर विचार विनिमय करणे हा विषय आला असता भाजप कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी सूचना मांडताना ३१ पैकी २८ कामे नामंजूर करण्याचा ठराव पटलावर ठेवला व त्याला माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनीं अनुमोदन दिले.असता राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके व संदीप वर्पे यांनी जोरदार हल्ला चढवला त्या वेळी संदीप वर्पे यांनी या रस्त्यांना निधी १४ व्या वित्त आयोगाचा असून त्याची मुदत संपली आहे.त्यामुळे याचे फेर अंदाजपत्रक बनवणे म्हणजे जवळपास आठ कोटींचा निधी गमावणे होय.त्यामुळे हा ठराव मंजूर करू नये अशी रास्त मागणी केली.फार तर यातील जी खडीकरणासारखी कामे वाढीव असतील ती रद्द करा.वास्तविक हि कामे नवीन दरपत्रकाप्रमाणे आहे.त्यासाठी कोल्हे गटाच्या कालावधीतील सन २०१० सालातील शासकीय दरपत्रकांचा दाखला दिला व त्यावेळी डिजलचे दर ४७-४८ रुपये प्रतिलीटर होते आज ते ८७ रुपयांवर गेले आहे.त्यामुळे व दर ठरवताना डी. एस.आर.चा विचार केला जातो त्या मूळे आजचे दर योग्य असल्याची शिफारस केली आहे.एस.जी.रोडवर आपले बालपण गेले आहे.शिवाय त्या रस्त्यावर एस.जी.शाळा कन्या शाळा.व गांधीनगर व अनेक उपनगरे असल्याचे सुचवून अन्य सदस्यांना वास्तवाचे भान आणून दिले आहे.तीच बाब अन्य रस्त्यांची असल्याचे लक्षात आणून दिली.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हि यंत्रणा त्या वेळी व गत चार वर्षात अंदाज पत्रक बनवताना चालली असताना आजच ती यंत्रणा का एकाएकी वाईट कशी झाली ? याचा जाब विचारला आहे.यावर उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व अन्य नगरसेवकांकडे गप्प बसण्या शिवाय पर्याय नव्हता.शहरातील प्रमुख सहा रस्ते हे जर झाले तर आपली राजकीय पंचाईत होईल हि साधार भीती हि कामे नाकारताना भाजपची झाली असल्याचे सुनावले आहे.त्याच वेळी आर्किटेक्चर ठरवताना त्यांनी सत्ताधारी गटाचा बेत पहिला व त्यांचे शुल्क हे दोन टक्क्यांच्या आत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.व या पूर्वी हेच शुल्क सात ते आठ टक्के देताना हे शुल्क जास्त वाटले नाही याचे आश्चर्य व्यक्त करून भाजपचे दात त्यांच्या घशात घातले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हि यंत्रणा हरकत घ्यायला पाकिस्तानी आहे का ? असा सवाल विचारला आहे.या निविदांवर आज पर्यंत सात ते आठ लाखांचा खर्च झाला आहे.तुमच्या मागणी प्रमाणे पुनर्निविदा करायच्या म्हटल्या तर पुन्हा वीस-एकवीस लाखांचा खर्च होईल याला जबाबदार कोण असा जाब विचारला आहे.तुम्ही आधी काही कामे बाकी ठेवली म्हणून आरोप केला होता.प्रशासनाने ती तांत्रिक उणीव दूर करण्यासाठी मागे ठेवली असताना तसा आरोप केला होता.पुढील बैठकीत सर्व कामे ठेवली तरी त्याला पुन्हा फाटे फोडून तुम्ही झोपेचे सोंग घेतले आहे.तुम्ही हवी त्या ठेकेदाराला काम मिळत नसल्याने हे उद्योग चालवले आहे.हि बाब लपून राहिली नाही.निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला हरकत का घेतली नाही.पुनर्निविदांची मागणी करून तुम्ही कालहरण केले जात आहे.व त्या केल्या तर पालिकेवर एक ते दीड कोटींचा खर्च वाढणार आहे.त्याला जबाबदार कोण असा सवाल केला आहे.४५० मिटर रस्त्यासाठी ९० लाखांचा खर्च करताना ते अंदाजपत्रक या नगरसेवकांना वाढीव वाटत नसल्याबद्दल कठोर शाब्दिक आसूड ओढले आहे.टीका करताना शहराचे वर्णन “धुळयुक्त शहर”म्हणायचे तर दुसरीकडे कामे होऊ द्यायची नाही हि भाजपची दुहेरी नीती उघडी केली आहे.त्यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके यांनी निखाडे यांच्यावर फलकाचे सतरा हजारांचा आरोप फेटाळून लावताना नीट अंदाजपत्रक पाहून बोलावे त्यात दोन फलकाची ती रक्कम असल्याचे निदर्शनास आणले व त्यांचे दात त्यांच्या घशात घातले आहे.त्यावर निखाडे यांना गुपचिळीचे धोरण घ्यावे लागले आहे.व शासन दरपत्रक सरकार ठरवते असे लक्षात आणून दिले आहे.व अधिकाऱ्यांना कामाची बिले कशी होतात याची विचारणा केली त्यावेळी अंदाजपत्रकातील सर्वच रक्कम खर्च होत नाही तर कामाप्रमाणे रक्कम अदा केली जाते.हि बाब बांधकाम विभागाने लक्षात आणून दिली.जेथे पेव्हर ब्लॉक बसवले जाणार नाही त्याचे बिल कसे काढतील आपण मग येथे बसून काय करतो” असा उलटा सवाल केला आहे.

दरम्यान या चर्चेत भाजप सोबत असलेले शिवसेनेचे नगरसेवक अनिल आव्हाड यांनी आपल्या प्रभागातील कामे स्थायी समितीत मंजूर केल्याची आठवण देऊन त्यांना संदीप वर्पे यांनी,”रस्त्यांची कामे मंजूर करण्यास आम्हाला मदत करा” असे आवाहन केले त्याला.”आव्हाड यांनी,” मी माझे पाहिले,”तुम्ही तुमचे पहा” असे उत्तर दिले आहे.अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी मागील बैठकीत आर्किटेक्चरसाठी सूचक म्हणून योगेश बागुल असून आजच्या सभेत तेच विरोध करत असल्याची महत्वपूर्ण बाब निदर्शनास आणली त्याला बागुल यांना उत्तर देता आले नाही.केवळ हास्य करून गप्प बसने पसंत केले आहे.

यावेळी कोल्हे समर्थक सेनेचे अपक्ष नगरसेवक कैलास जाधव यांनी माजी आ.कोल्हे यांची दोन लाखांचा निधी आणला त्यावेळी वहाडणे यांनी विरोध करून उच्च न्यायालयात वाद नेऊन विरोध केला असल्याची बाब निदर्शनास आणून त्यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक गप्प का बसले असा सवाल केला.खुल्या नाट्यगृहाचा निधी का वापरला नाही असा सवाल केला.त्यात पालिकेचे नुकसान झाले नाही का ? असा तिरका सवाल केला.व आमच्या ठरावाला विरोध करण्यास वीस जण असल्याचे निदर्शनास आणले त्याला नगरसेवक मंदार पहाडे यांनी हरकत घेतली व केवळ अकरा जण असल्याचे सांगितले.तर सेनेच्या नगरसेविका सपना मोरे यांनी दोन कोटीतील कामे आमच्या प्रभागात का केली नाही ? असा थेट सवाल नगरसेवक कैलास जाधव यांना विचारला त्यावर त्यांनी,”तुम्ही पार्टी विरोधात गेल्याने काम झाले असल्याचे ऐकवले त्यावेळी महिला नगरसेवक मोरे यांनी पत्रकारांचे या बाबीकडे लक्ष वेधून घेतले व कबुली दिल्याचे माध्यमांचे लक्षात आणून विकास कामे कशी तोंड पाहून चालतात हे निदर्शनास आणून दिले.त्यावेळी या चर्चेत नगराध्यक्ष वहाडणे यांनी भाग घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी हा आपल्याला अंधारात ठेऊन मंत्री पातळीवर वळवला असल्याची बाब लक्षात आणली.व वहाडणे यांना स्रेय मिळू नये म्हणून हे षडयंत्र सुरु असल्याचे निदर्शनात आणले.व कन्सल्टंट म्हणून २०११ साली सोमेश कायस्थ यांना १५ ते २० लाख का दिले ? हे आरोप करणाऱ्यांना विचारुन टोला लगावला आहे.व अंदाज पत्रक बनवायला या पूर्वी जीवन प्राधिकरण चालले ते आत्ताच का चालले नाही” याचा संदर्भ देऊन पुनर्निविदा करू नये” असे आवाहन केले आहे.फार तर या कामात खडीकरण रद्द करा पण कामे मंजूर करा असा सल्ला दिला आहे.व येवला रोडला खड्डे पडले आहे.फार तर जेवढे अंदाजपत्रक तेवढीच रक्कम द्या पण निविदा मंजूर करा अशी मागणी केली आहे.काही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना,”फार चर्चा करून उपयोग नाही सगळे ठरलेले आहे”.असे निदर्शनास आणले व सांगून झोपेचे सोंग घेणाऱ्यापुढे काहीही सांगितले तरी काही उपयोग होणार नाही हि बाब वर्पे व बोरावके,पहाडे यांच्या निदर्शनास आणली.व हा विषय सभागृह पुढे ठेवा त्यांना काय करायचे ते करू द्या”पुढील काम आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणी करून सोडवू असा भांडणाच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दिलासा दिला आहे.तर नगरसेवक मेहमूद सय्यद,संदीप पगारे यांनी व प्रतिभा शिलेदार यांनी काहीही करा पण आमच्या प्रभागातील ठराव मंजूर करा अशी मागणी लावून धरली ठराव मंजुरीला टाकला व तो भाजपने हात वर करून मंजूर केला आहे.त्यामुळे कोपरगावची रस्त्यांची साडेसाती अद्याप संपण्याची चिन्हे नाही.यावेळी भाजपकडून उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,गटनेते रवींद्र पाठक,कैलास जाधव,अल्ताफ कुरेशी,शिवाजी खांडेकर,जनार्दन कदम,सत्येन मुंदडा,विजय वाजे,योगेश बागुल,आदींनी तर राष्ट्रवादीकडून संदीप वर्पे,गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,सपना मोरे,प्रतिभा शिलेदार,वर्षा शिंगाडे आदींनी तर अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी खिंड लढवली आहे.

दरम्यान या चर्चेत भाजप सोबत असलेले शिवसेनेचे नगरसेवक अनिल आव्हाड यांनी आपल्या प्रभागातील कामे स्थायी समितीत मंजूर केल्याची आठवण देऊन त्यांना संदीप वर्पे यांनी,”रस्त्यांची कामे मंजूर करण्यास आम्हाला मदत करा” असे आवाहन केले त्याला.”आव्हाड यांनी,” मी माझे पाहिले,”तुम्ही तुमचे पहा” असे उत्तर दिले आहे.अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी मागील बैठकीत आर्किटेक्चरसाठी सूचक म्हणून योगेश बागुल असून आजच्या सभेत तेच विरोध करत असल्याची महत्वपूर्ण बाब निदर्शनास आणली त्याला बागुल यांना उत्तर देता आले नाही.केवळ हास्य करून गप्प बसने पसंत केले आहे.शेवटी संदीप वर्पे यांनी पालिकेच्या रस्त्यांच्या होणाऱ्या नुकसानींस आर्थिक बोजा याची निश्चिती करून आपण ठराव नामंजुरीस जबाबदार राहणार नाही व त्याची इतिवृत्तात दखल घेण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली त्यांनी त्याची दखल घेतल्याचे सांगितले आहे.व ठराव नामंजुरीच्या बाजूने भाजची अठरा तर मंजुरीच्या बाजूने नगराध्यक्षा सह अकरा मते पडली असल्याने हि कामे अखेर भाजपने आपल्या दुराग्रहाने अखेर नामंजूर करून आपला आतबट्याचा ठराव आपल्या पदरात पाडून कोपरगाव हि खऱ्या अर्थाने “आसुरभूमी” असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.आता राज्यात सत्ताधारी गटाचे आ.आशुतोष काळे,नगराध्यक्ष वहाडणे व राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close