कोपरगाव तालुका
चासनळीत विविध कामांचे भूमिपूजन संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी,चासनळीमध्ये आ.आशुतोष काळे यांनी १ कोटी रुपये रस्त्यांसाठी निधी देवून या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील सभासदांच्या अडचणी सोडवून परिसरासाठी शैक्षणिक,सामाजिक योगदान देवून या परिसराचा विकास साधला ती परंपरा यापुढेही सुरु राहणार-आ.आशुतोष काळे.
कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी,चासनळी येथे मुख्य लेखाशिर्ष २५१५ ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत ०१ कोटी रुपये निधीतून जिल्हा परिषद शाळा ते कैलास चांदगुडे घर रस्ता,बाबासाहेब चांदगुडे घर ते सुधाकर तिडके घर रस्ता,सुभाष गाडे घर ते सोपान आहेर घर रस्ता तसेच हंडेवाडी येथील सतीश आहेर घर ते जी.प. शाळा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व जिल्हा परिषद जनसुविधा योजना व १४/१५ व्या वित्त अयोगातून बांधण्यात आलेल्या हंडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे लोकार्पण आ.काळे यांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब गाडे होते.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक अशोक तिरसे, सचिन चांदगुडे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,पंचायत समिती सदस्य अनिल कदम,डॉ.मच्छिन्द्र बर्डे,भाऊसाहेब गाडे,भास्कर चांदगुडे,सुभाष गाडे,सोमनाथ चांदगुडे,प्रभाकर चांदगुडे,विकास चांदगुडे,दिलीप चांदगुडे,सोमनाथ घुमरे,निवृत्ती घुमरे,प्रभाकर भारती,सोमनाथ कांगने,सर्जेराव सोनवणे,संदीप जाधव,अण्णासाहेब चांदगुडे,रवींद्र आहेर,सुनील गाडे,अनिल चांदगुडे,महेश आहेर,कैलास आहेर,कमलाकर चांदगुडे,मधुकर तिडके,निवृत्ती घुमरे,देवराम गावंड,सदाशिव देशपांडे,नवनाथ चव्हाण,भाऊसाहेब भारती,शिवराम भारती,सोमनाथ सोनवणे,बंडू चव्हाण,प्रभाकर भारती,गणेश घुमरे आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना आ.काळे म्हणाले की,”माजी खा.शंकरराव काळे, माजी आ.अशोक काळे यांनी हंडेवाडी,चासनळी व पंचक्रोशीतील गावातील शाळा, रस्ते,पूल,आदी महत्वाचे प्रश्न सोडविले.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासदांच्या अडचणी सोडवून परिसरासाठी शैक्षणिक,सामाजिक योगदान देवून या परिसराचा विकास साधला ती परंपरा यापुढेही सुरु राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हंडेवाडी,चासनळीच्या दुरावस्था झालेल्या मुख्य रस्त्यांचे काम मार्गी लावून या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हंडेवाडी, चासनळी व पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.