जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

चासनळीत विवाहितेचा विनयभंग,आरोपीस पहाटे अटक,आरोपी कोण ? चर्चेला उधाण !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील चास नळी ग्रामपंचायत हद्दीत परगावची मात्र आपला किराणा दुकानात व्यवसायानिमित्त चासनळीत स्थायिक असलेल्या तीस वर्षीय विवाहित महिलेचा त्याच गावातील आरोपी सचिन शिंदे याने विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने चासनळी परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस रात्री अडीच वाजेच्या सुमारास अटक केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहराच्या पश्चिमेस चासनळी ग्रामपंचायत असून हे गाव लोकसंख्येने मोठे आहे.आजूबाजूचा परिसरातील गावांचा मोठा संपर्क असल्याने या गावात व्यवसाय उदीमही मोठ्या प्रमाणात आहे.त्याच गावात एका खाजगी व्यापारी संकुळत्या महिलेचे किराणा दुकान असून येथे वरील आरोपी दुकानात वारंवार ये जा करत होता.

बुधवार दि.२१ ऑगष्ट रोजी सायंकाळी साडे आठच्या सुमारास अन्य कोणी दुकानात नाही ही संधी साधत आरोपी सचिन शिंदे याने गाय छाप तंबाखूची पुडी घेण्याचा बहाणा केला व सदर दुकानातील महिलेला म्हणाला की,मला तू खूप आवडते,मी केवळ तुझ्यासाठी दुकानात येतो.मला तुझा मोबाईल नंबर दे! असे म्हणून हात धरून जवळ ओढून त्याने सदर महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे आक्षेपार्ह कृत्य केले आहे.

विशेषतः आपद्ग्रस्त महिला दुकानात असली की तो संधी साधून येत.असाच तो बुधवार दि.२१ ऑगष्ट रोजी सायंकाळी साडे आठच्या सुमारास अन्य कोणी दुकानात नाही ही संधी साधत त्याने गाय छाप तंबाखूची पुडी घेण्याचा बहाणा केला व सदर दुकानातील महिलेला म्हणाला की,मला तू खूप आवडते,मी केवळ तुझ्यासाठी दुकानात येतो.मला तुझा मोबाईल नंबर दे! असे म्हणून हात धरून जवळ ओढून त्याने सदर महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे आक्षेपार्ह कृत्य केले आहे व सदर घटना कोणाला सांगितली तर असे म्हणून सदर महिलेस शिवीगाळ केल्याची तक्रार सदर महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

दरम्यान तालुका पोलिसांनी आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आज दुपारी हजर केले असता दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी सचिन शिंदे यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या प्रकरणी तालुका पोलिसांनी गु.र.नं.११७/२०१९ भा.द.वि. कलम ३५४,(अ),५०४,५०६,अ.जा.ज.अ. क,का,२०१५ चे कलम ३(१),(ड)(डब्लू),(१) अन्वये आरोपी सचिन शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पहाटे अडीच वाजेच्या सुमारास राहत्या घरातूनअटक केली असल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली आहे.पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डीचे विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close