कोपरगाव तालुका
सूर्यतेजचे वृक्षारोपण आणि पालकत्व अभियान
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेमार्फत स्वच्छता अभियान, जलशक्ती अभियान,वनमहोत्सव -२०१९ अंतर्गत ३३ कोटी वृक्षलागवडीत सहभागी होवून
वृक्षारोपण आणि पालकत्व अभियान सुरु असल्याची माहिती सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी जनशक्तीला न्युजला दिली आहे.
राज्य शासनाच्या वनविभागाने वनमहोत्सव आणि जलशक्ती अभियान अंतर्गत दि.१ जुलै २०१९ ते दि.३१ सप्टेंबर २०१९ या कालावधीत लोकसहभाग वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता .त्यात कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेने प्रतिसात देत मोफत रोपांचे वितरण,वृक्षारोपण आणि त्याचे योग्य संगोपन होणेसाठी एक झाड एक पालक नेमण्यात पुढाकार घेतला आहे.
सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव व राहाता तालुक्यातील विविध गांवात तीन वर्षात सुमारे तेहतीस हजार वड,कडुनिंब,कन्हेर,रेनट्री,गुलमोहर
यासह विविध फुलं,फळ रोपांचे मोफत वितरण,रोपण आणि पालकत्व दिले आहे.कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत,शाळा,महाविद्यालय कोकमठाण,संवत्सर,रवंदे,शिरसगाव-सावळगांव,आपेगांव,देर्डे-कोर्हाळे,डाउच
बु।।,टाकळी,कोळपेवाडी यासह तालुक्यातील बहुतांश गावांचा समावेश आहे.तर राहाता तालुक्यात पाच हजार पाचशे रोपांचे मोफत वितरण,रोपण आणि पालकत्व दिले आहे.यावर्षी वनमहोत्सव आणि जलशक्ती अभियानात लोकसहभागातून सुमारे
पंधरा हजार रोपांचे मोफत वितरण,रोपण आणि पालकत्व दिले आहे.
सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव व राहाता तालुक्यातील विविध गांवात तीन वर्षात सुमारे तेहतीस हजार वड,कडुनिंब,कन्हेर,रेनट्री,गुलमोहर
यासह विविध फुलं,फळ रोपांचे मोफत वितरण,रोपण आणि पालकत्व दिले आहे.
यात के.जे.सोमैया महाविद्यालय, एस.एस.जी.एम.महाविद्यालय,सैनिकी
वसतीगृह,एस.जी.विद्यालय,छत्रपती शिवाजी,संभाजी विद्यालय,राधाबाई काळे विद्यालय,पुणतांबा आशा केंद्र,चांगदेव महाराज ट्रस्ट,उर्दू
हायस्कूल,कोकमठाण,डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्या मंदिर प्राचार्य डॉ.शंकर थोपटे,डॉ.बिरेंद्रसिंग यादव,रमेश गवळी,सौ.मंजुषा सुरवसे,छाया
काकडे,राजेंद्र पाचोरे,सुखदेव काळे यांनी सहशिक्षकांनी सहभाग घेतला
आहे.वृक्षारोपण आणि पालकत्व अभियान बरोबर जलशक्ती जनजागृती अभियानात
सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके,मिलिंद जोशी,अँड.महेश भिडे,मार्गदर्शिका लताताई भामरे,बी.एस.वाघ,महेश थोरात,अनंत
गोडसे,बंडोपंत चिंचपुरे,शिरिष धनवटे,आनंद टिळेकर,रवींद्र भगत,कल्पेश टोरपे,अमोल पवार यांचे सह सूर्यतेज संस्थेचे हरितसेना सदस्यांनी परिश्रम
घेतले आहे. त्यांचे जलशक्ती अभियानच्या सहसचिव रिचा बागला,सुप्रिया देवस्थळी-कोलते,अखिलेश अग्रवाल,जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,उपवनसंरक्षक
आदर्श रेड्डी, उपविभागीय अधिकारी व जलशक्ती अध्यक्ष गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,तालुका कृषी अधिकारी व जलशक्ती सचिव अशोक
आढाव यांचे सह जलशक्ती आणि वनमहोत्सवात सहभागी सर्वांनी अभिनंदन केले
आहे.