जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिक्षकानेच विद्यार्थिनीस पळविले,कोपरगाव तालुक्यातील घटना ?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मूळ करंजी येथील रहिवासी असलेले मात्र रवंदे ग्रामपंचायत हद्दीत व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या एका शेतकरी तथा व्यापाऱ्यांच्या मुलीस एका खाजगी उच्च माध्यमिक विद्यालयात धडे देणाऱ्या शिक्षकानेच पळून नेल्याची धक्कादायक घटना घडल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंचेचाळीस वर्षीय मुलीच्या पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आपली मुलगी हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मूळ कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील रहिवासी असलेले शेतकरी कुटुंब आपल्या किराणा व तत्सम व्यवसायासाठी रवंदे गावी पंधरा-वीस वर्षांपूर्वी स्थायिक झाले.त्यांनी आपल्या व्यवसायाचा चांगला जमही बसवला. आपला एक मुलगा व एकुलती एक मुलगी यांना उच्च शिक्षण देण्यासाठी मुलीच्या पित्याने दहावी नंतर गावातीलच एका खाजगी उच्च माध्यमिक विद्यालयात तिला शिक्षणासाठी दाखल केले. त्याच विद्यालयात सदर मुलीला शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या एका शिक्षकाची वक्रदृष्टी तिच्यावर पडली नजरेला नजर भिडून त्याचे प्रेमात रूपांतरण कधी झाले हे त्यांनाही कळले नाही ही मुलगी अलगत या महाशयांच्या गळाला लागली.मात्र ही बाब त्यांनी कोणालाही कळू दिली नाही.

आपला एक मुलगा व एकुलती एक मुलगी यांना उच्च शिक्षण देण्यासाठी मुलीच्या पित्याने दहावी नंतर गावातीलच एका खाजगी उच्च माध्यमिक विद्यालयात तिला शिक्षणासाठी दाखल केले. त्याच विद्यालयात सदर मुलीला शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या एका शिक्षकाची वक्रदृष्टी तिच्यावर पडली नजरेला नजर भिडून त्याचे प्रेमात रूपांतरण कधी झाले हे त्यांनाही कळले नाही ही मुलगी अलगत या महाशयांच्या गळाला लागली.

मुलीचे तेथिल बारावी पर्यंतचे शिक्षण संपल्यावर वडिलांनी आपल्या लाडलीला आणखी उच्च शिक्षण द्यायचे म्हणून कोपरगाव येथील एका महिला महाविद्यालयात बी.सी.ए. साठी प्रवेश मिळवला ते शिक्षण सुरु असतानाच या शिक्षक (?) महाशयांनी अद्यापही या कोवळ्या मुलीचा पिच्छा सोडला नव्हता.त्याने वेळोवेळी तिच्याशी संपर्क ठेवून आपला प्रवास पुढे सुरु ठेवलाच होता.व तिला उपवर होण्याची हे महाशय वाटच पाहत होते.तिच्या कोवळ्या पावलांनी कालच कुठे अठरा वर्षाचे कायदेशीर वय पूर्ण केले असतानाच त्याच दिवशी या शिक्षक महाशयांनी तिला थेट आपल्या आई-वडिलांकडून एका बेसावध क्षणी पळवून नेले व अठरावर्ष वय ज्या दिवशी पूर्ण झाले त्याच दिवशी नाशिक ,पंचवटी येथे वैदिक पध्दीतीने वैदिक विवाह करून त्याची रीतसर शासकीय दप्तरी नोंद करण्यास हे महाशय विसरले नाही.हि मुलगी सवर्ण तर हे शिक्षक महाशय मागासवर्गीय असल्याची माहिती मिळते.त्यांनी विवाहाचा रीतसर दाखला मिळवून ते कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले .कारण इकडे दोन दिवसापासून आपली मुलगी बेपत्ता झाली म्हणून आई वडिलांच्या व संपूर्ण कुटुंबाच्या तोंडचे पाणी पळाले होते.शोधाशोध करूनही मुलगी सापडत नाही म्हणून मुलीच्या पित्याने अखेर कंटाळून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अखेर मुलगी हरविल्याची तक्रार दाखल केली होती.पोलिसही या बाबत शोध घेत असताना पोलिसांनी संबंधित इसमाचा भ्रमणध्वनी मिळवून त्याला तातडीने कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल होण्यास फर्मावले होते.अखेर त्यांना नांगी टाकावी लागली व हे शिक्षक महाशय आपल्या नववधूला पांढऱ्या मारुतीत घेऊन तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले होते व त्यांनी आपण या मुलीशी तिच्या आपसंमतीने रजीष्टर कार्यालयात लग्न लावल्याचा दाखलाच हजर केला. तालुका पोलिसांनी या बाबत मुलीच्या बापास बोलावून सर्व कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या सरकारचेच आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन असल्याचे समजून सांगितले व त्यात येणाऱ्या कायदेशीर अडचणींची जाणीव करून देऊन त्यांची परत पाठवणी करून दिली.या शिक्षक महाशय व मुलीचे लेखी जबाब नोंदवून घेतले व त्यांची, “नांदा सौख्यभरे” म्हणून बाहेर पाठवणी करून दिली आहे.वडिलांना खाली हात परतावे लागले आहे.
दरम्यान या घटनेची रवंदे, करंजीसह कोपरगाव तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली होती.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close