जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जलशक्ती अभियानात कृषी विभाग आघाडीवर-कृषी अधिकारी आढाव

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)
भारत सरकारचे जलशक्ती अभियान अंतर्गत कोपरगांव तालुका कृषी विभागाने नाला खोलीकरण,शेततळे,विहीर पुर्नभरण अशी विविध कामे कोपरगांव तालुक्यात हाती घेतली असून त्यातील काही कामे पुर्णत्वास तर काही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व जलशक्ती सचिव अशोक आढाव यांनी दिली आहे.

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या सहसचिव रिचा बागला,सुप्रिया देवस्थळे-कोलते,अखिलेश अग्रवाल, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,उपविभागीय अधिकारी व जलशक्ती अध्यक्ष गोविंद शिंदे,जिल्हा कृषी अधिकारी विलास नलगे,उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,तहसीलदार योगेश चंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगांव तालुक्यातील कृषी विभागाने १ जुलै २०१९ ते १ सप्टेंबर २०१९ पर्यंत विविध कामे हाती घेतली आहे.यात शेततळे लोकसहभागातून भोजडे २ दोन,संवत्सर एक शेततळे बांधण्यात आले आहे. तसेच लोकसहभागातून बांध बंदिस्ती सावळगांव दोन,कासली चार ठिकाणी करण्यात आली आहे. नाला खोलीकरणाच्या माध्यमातून व्यापक लोकसहभागातून संवत्सर येथे एक तर कोकमठाण येथे अकरा,चांदेकसारे येथे ३,मढी बु।। एक,सावळगांव दोन नाला खोलीकरण लोकसहभागातून करण्यात आले आहे. विहीर पुर्नभरण या कामात सडे दोन विहिरी,पढेगांव तीन विहिरी,कोकमठाण तीन विहिरी,खोपडी तीन विहिरी,बोलकी चारविहिरी,जेउरकुंभारी आठ विहिरी,अंजनापुर,जेउरपाटोदा येथे प्रत्येकी एक प्रमाणे विहिरी पुर्नभरण केले आहे.तसेच कृषी विभागामार्फत मार्फत मागेल त्याला शेततळे कोपरगांव तालुक्यात ६५ ठिकाणी देण्यात आले आहे.त्याचे कामही पुर्ण झाले आहे.वृक्षारोपण अभियानात अंजनापूर येथे विविध पाच ठिकाणी फळझाडांचे वृक्षारोपण करुन पालकत्व दिले आहे.जलशक्ती अभियान अंतर्गत कृषी मेळावे दहेगांव बोलका,कोळपेवाडी,कुंभारी,अंजनापुर,जेउरपाटोदा आणि कोपरगांव तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचा ‘पावसाचे पाणी जिरवू अंगणी’ याबद्दल प्रबोधन जनजागृती मेळावा येथे घेण्यात आले आहे.
यात तालुका कृषी अधिकारी व जलशक्ती सचिव अशोक आढाव,मंडल कृषी अधिकारी मनोज सोनवणे,चांगदेव जवणे,वसंत फिरोदिया,जलशक्ती तालुका समन्वयक सुशांत घोडके,तंत्रज्ञ सहाय्यक राहुल घुले यांचे सह कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक आणि शेतकरी यांनी लोकसहभागातून होणाऱ्या जलशक्ती अभियानात सहभाग घेतला असून ग्रामीण भागातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close