कोपरगाव तालुका
तरुण पिढीने व्यवसायात उतरावे-माजी नगराध्यक्ष
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारत महाशक्ती म्हणून उदयास येत असून परकीय गंगाजळी भारतात मोठ्या प्रमाणात येत असून त्या सोबत उद्योगही येत असून उच्च शिक्षित तरुणाईला आता व्यवसायात नक्कीच मोठया संधी असल्याने तरुणांनी आगामी काळात व्यवसायात उतरावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषेदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले आहे.
तरुण युवकांनी या बांधकाम व्यवसायात उतरावे कोपरगाव शहरात याला चांगला प्रतिसाद आहे.बांधकाम व्यवसायाला मरण नाही.शून्यातून रवींद्र खापेकर व नवनाथ खापेकर बंधूचे उदाहरण सर्वांना प्रेरणादायी आहे-मंगेश पाटील,नगराध्यक्ष.
कोपरगाव शहरातील शिंदे-शिंगीनगर,समतानगर भागात रवींद्र खापेकर बंधूंच्या नव्या रुद्रा कन्स्ट्रशन बिल्डर अँड डेव्हलपर या नूतन कार्यालयाचे उद्धघाटन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी बोलताना पाटील म्हणाले की,”तरुण युवकांनी या बांधकाम व्यवसायात उतरावे कोपरगाव शहरात याला चांगला प्रतिसाद आहे.बांधकाम व्यवसायाला मरण नाही.शून्यातून रवींद्र खापेकर व नवनाथ खापेकर बंधूचे उदाहरण सर्वांनी घेण्यासारखे आहे त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी शेखर राहणे,अडँ.सुशांत क्षीरसागर,श्री गुंजाळ,मनोहर शिंदे,महारुद्र चव्हाण,विलास महिरे,मोहन रासकर,सुमेश हांडे,चंद्रकांत शेजुळ,गोविंद आढळ,अशोक उंडे,गोकुळ वाघ,नारायण चौरे,शिवाजी मगर,श्री पाटील,राजेश गुंड,रमेश पवार,ज्ञानेश्वर खैरनार,मंगेश शिंदे,भैरव वाघेला,दिपक नाईकवाडे, दिपक मांडगे,गणेश कुहिले,राहुल गरकल,विजय खंडिझोड,श्री ससाणे,राजेंद्र खुटे,अभियंता मनोज डोखे,गणेश पवार,शरद शिंदे,अजय सूर्यवंशी,दादासाहेब कराळे,राजेश बढे,सिद्धार्थ खंडिझोड,तुषार गांगुर्डे,बाळासाहेब शिंदे,बाळासाहेब मुंगसे,हारून पठाण,साजिद शेख,सतिश,तुषार साठे,विकी आहेर,श्रेयस शिंदे,अमर शिंगाने,हर्षल साठे,मंगेश देवठक आदी मान्यवर उपस्थित होते.