जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या पतसंस्थेच्या सभागृहाला दिले या संचालकांचे नाव

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात सहकारी पतसंस्था चळवळीत अग्रणी असलेल्या समता सहकारी नागरी पातासंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभागृहाला जेष्ठ संचालक स्व.मोहनशेठ झंवर यांचे नाव देण्याचा निर्णय नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत समंत झाला असून या सभागृहाचे नामकरण नुकतेच भाजपचे उपाध्यक्ष शाम जाजू यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे.

कोपरगाव शहरातील व्यापारी,किराणा दुकानदार,समता पतसंस्थेचे सभासद मोहनशेठ झंवर यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाला कधीही विसरू शकत नाही.त्यांच्या स्मृती जतन करून ठेवण्यासाठी समता पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभागृहाचे नामकरण देखील त्यांचे नावाने नुकतेच करण्यात आलेले आहे-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष समता नागरी सहकारी पतसंस्था,कोपरगाव.

समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक मोहनशेठ झंवर यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्याचे या पतसंस्था चळवळीसाठी मोठे योगदान होते.त्याची दखल घेण्यात आली असून त्या साठी समता नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी पुढाकार घेतला आहे.

सदर प्रसंगी या सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजू हे प्रमुख पाहुणे तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोषजी मंडलेचा,महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष किसनजी भन्साळी,अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी कार्यकारी संचालक आर.डी.मंत्री.,कै.मोहनलाल झंवर यांच्या पत्नी श्रीमती सुमनबाई झंवर,पुणे येथील उद्योजक विजय झंवर,अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभा संयुक्त मंत्री विठ्ठल आसावा,जिल्हाध्यक्ष अनिष मनियार,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बजाज,सचिव अजय जाजू,कोपरगाव तालुका माहेश्वरी सभा अध्यक्ष संतोष मुंदडा,श्रीरामपूर तालुका माहेश्वरी सभा अध्यक्ष चेतन भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती तर कै.मोहनशेठ यांचे स्नेही रावजी पटेल,अजित लोहाडे, भास्कर आढाव,उद्योजक कैलास ठोळे,समता पतसंस्थेचे उपाध्यक्षा श्वेता अजमेरे,संचालक गुलाबचंद अग्रवाल,अरविंद पटेल,रामचंद्र बागरेचा,जितुभाई शहा,चांगदेव शिरोडे,संदीप कोयटे,गुलशन होडे,कचरू मोकळ,संचालिका शोभा दरक,समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे,समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे,समताचे जनरल महाव्यवस्थापक सचिन भट्टड,समताच्या महाराष्ट्रातील विविध शाखांचे शाखाधिकारी,कर्मचारी,अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक असेलेले कै.मोहन झंवर समता पतसंस्थेच्या माध्यमातून छोटे मोठे व्यापारी दुकानदारांना न्याय देण्यासाठी नेहमीच आग्रही असायचे,त्याचप्रमाणे कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनद्वारे व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असत अशी माहिती समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी सदर प्रसंगी दिली आहे.

या समारंभाचे सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close