कोपरगाव तालुका
डॉ.आंबेडकरांचे दलित समाजावर मोठे उपकार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दलित समाजावर मोठे उपकार असल्याचे सांगुन ते स्वतः करता जगलेच नाहीत शेवटच्या श्वासा पर्यंत आपल्या दलित समाजाच्या उद्धाराकरिता संपूर्ण आयुष्य वेचले याचे तरुणांनी भान ठेवावे व शिका,संघटीत व्हा,आणि संघर्ष करा या मंत्राचा अवलंब करून डॉ.बाबासाहेबांना अपेक्षित असणारे आदर्श जिवन जगावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव दत्तात्रय गोतिसे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
डॉ.भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ,तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस कोपरगाव तालुक्यातील वारी येथिल संत शिरोमणी रविदास महाराज मंदीर कडु कानडे वस्ती वारी येथे अभिवादन करण्यात आले आहे.त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे,अहमदनगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष अशोक कानडे,विशाखा निळे,वारीचे सरपंच सतिश कानडे,युवा जिल्ह्याध्यक्ष दत्तात्रय दुशिंग,वसंत थोरात,श्री पवार,अनिल कानडे,संजय दुशिंग,पप्पु दुशिंग,भाऊसाहेब कडु,मधुकर कडु, विकास थोरात ,दिपक देशमुख ,बाबासाहेब कडु ,दत्ता जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी डॉ.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन व पुजन केले आहे.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन अशोक कानडे यांनी केले तर भारतीय बौध्द महासभेचे दिवाकर निळे व विशाखा निळे यांनी प्रार्थना,पंचम प्रणाम घेउन त्रिवार अभिवादन केले आहे.