गुन्हे विषयक
कोपरगावात दुकानफोडी,अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील कोपरगाव बेट भागातील रहिवाशी असलेले दुकानदार अभिषेक राजेंद्र आव्हाड यांच्या मालकीचे अथर्व जनरल स्टोअर्स हे दुकान रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी फोडून त्यातील स्टेशनरी व रोख रक्कम असा ३४ हजार ७६० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघड झाली आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहरात कोरोना साथ सुरु असताना आता चोरट्यानी आपली हाथ की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला आहे.दुचाकी चोरणे,महिलांचे दागिने ओरबाडने,रास्ता लुटीच्या घटनात लक्षणीय रित्या वाढ झाली आहे.शहरात पोलिसांची गस्त सुरु असली की या घटनावर नियंत्रण येते.मात्र वर्तमानात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून नवीन अधिकारी अजून शहराची माहिती करून घेत असावे असे दिसते.त्याचा फायदा चोरटे घेत आहेत.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात कोरोना साथ सुरु असताना आता चोरट्यानी आपली हाथ की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला आहे.दुचाकी चोरणे,महिलांचे दागिने ओरबाडने,रास्ता लुटीच्या घटनात लक्षणीय रित्या वाढ झाली आहे.शहरात पोलिसांची गस्त सुरु असली की या घटनावर नियंत्रण येते.मात्र वर्तमानात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून नवीन अधिकारी अजून शहराची माहिती करून घेत असावे असे दिसते या कालखंडात चोरट्यानी आपली हाथ की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे दिसत आहे.अशीच घटना कोपरगाव बेट भागात घडली असून ते आपले दुकान नेहमी प्रमाणे सायंकाळच्या वेळेस बंद करून गेले असता व सकाळी नित्य नियमाप्रमाणे दुकान उघडण्यास आले असता त्यांना आपले दुकानाच्या छतांचे पत्रे तोडून चोरट्यानी दुकानात प्रवेश करून उचका पाचक केलेली आढळली आहे.दुकानातील स्टेशनरी साहित्य व रोख रक्कम असा ३४ हजार ७६० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेला आढळला आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.क्रं.८४०/२०२० भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुहा दाखल केला आहे.पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी. पवार हे करीत आहेत.